लोकसभेच्या निवडणुकीत `रेकॉर्ड ब्रेक’ मताधिक्य देण्याचा निर्धार, निवडणूक प्रचारासाठी जिल्हा समन्वय समितीची होणार स्थापना
धुळे : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय व राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी धुळे मतदारसंघातून विकासरत्न डॉ. सुभाष भामरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आदी मित्रपक्षांची महायुती आहे. महायुतीचा राजधर्म पाळताना आपसांतील सर्व हेवेदावे, मतभेद बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह खासदार डॉ. सुभाष भामरे यांची हॅट्ट्रिक करण्यासाठी आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत. एवढेच नव्हे, तर या निवडणुकीत डॉ. भामरे यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य मिळवून देण्याचा ठाम निर्धारही महायुतीच्या मित्रपक्षांनी केला.
दरम्यान, या बैठकीत आगामी निवडणुकीचे प्रचारासह सभा आदींचे सर्व नियोजन करण्यासह सुसूत्रतेसाठी मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार डॉ. भामरे यांना लोकसभेच्या धुळे मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महायुतीच्या सर्वच मित्रपक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांची येथील पारोळा रोडवरील राम पॅलेसमध्ये बैठक झाली. तीत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आरपीआय (आठवले गट) आदी मित्रपक्षांच्या नेत्यांनी हा निर्धार केला. बैठकीला खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार तथा भाजपचे धुळे लोकसभा क्षेत्रप्रमुख राजवर्धन कदमबांडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, महानगराध्यक्ष कैलास चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सत्यजित शिसोदे, सुमित पवार, राजेंद्र चितोडकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख सतीश महाले, समाधान शेलार, आरपीआयचे वाल्मीक दामोदर, ॲड. महेंद्र नेळे, शशिकांत वाघ, प्रभाकर जाधव, भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा, माजी महापौर प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, महानगराध्यक्षा वैशाली शिरसाट, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी, मंडलाध्यक्ष रितेश परदेशी, हरीश शेलार, भाजयुमोचे आकाश परदेशी यांच्यासह सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार डॉ. भामरेंना मंत्रिपदापर्यंत पोहोचवूया : प्रा. जाधव म्हणाले, की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खासदार डॉ. भामरे यांनी केलेल्या विकासकामांची दखल घेत पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली. आता अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणत मंत्रिपदापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली अहे. राष्ट्रवादीचे श्री. सोनवणे यांनी महायुतीचे मित्रपक्ष आपसांत कुठलेही मतभेद न ठेवता एकदिलाने काम करतील. या निवडणुकीत आपण आपली ताकद दाखवून देताना गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी सज्ज आहोत, अशी ग्वाही दिली. शिवसेनेचे महाले म्हणाले, की नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. आपण सर्व एक आहोत. यामुळे या निवडणुकीत डॉ. भामरे यांना दुप्पट मताधिक्य मिळवून देण्यासाठी सज्ज होऊ. राष्ट्रवादीचे चौधरी म्हणाले, की पक्षाचे शहरातील पदाधिकारी-कार्यकर्ते खासदार डॉ. भामरेंच्या प्रचारात कुठेच कमी पडणार नाहीत, याची ग्वाही देतो. किरण शिंदे म्हणाले, की राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ. भामरे यांच्या विजयात मोलाचे योगदान देतील. तसेच गेल्या वेळेपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी जिवाचे रान करतील. भाजपचे चौधरी म्हणाले, की डॉ. भामरे यांनी गेल्या १० वर्षांत केलेल्या विकासकामांमुळेच त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. यावेळी मताधिक्य चार लाखांवर पोहोचविण्यासाठी सर्वच घटक पक्षांनी जोमाने काम करूया. आरपीआयचे दामोदर म्हणाले, की मितभाषी, सुशिक्षित व्यक्तिमत्त्वाचे धनी खासदार डॉ. भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. आता त्यांना रेकॉर्ड ब्रेक आघाडी मिळविण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती आपण समन्वयातून पार पाडू. संजय शर्मा म्हणाले, की २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी डॉ. भामरे यांचा संसदेचा दागिना असा उल्लेख केला होता. हाच दागिना आता कोहिनूरच्या रूपात आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम करून त्यांच्या अधिकाधिक मताधिक्यासाठी प्रयत्न करूया. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी आभार मानले.
सर्वांचा मान-सन्मान राखून नियोजन आखू : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला पुन्हा एकदा उमेदवारी दिली, यासाठी सर्वांचा ऋणी आहे. आता महायुतीच्या माध्यमातून आपण एकत्रित लढणार असून, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्याचा आपण संकल्प केला. आज महायुतीतील प्रत्येक मित्रपक्षाच्या नेत्याने तशी ग्वाही दिली त्यासाठी सर्वांचे आभार. आगामी निवडणुकीसाठी आपण समन्वय समितीच्या माध्यमातून सतत संपर्कात राहून योग्य ते नियोजन करू. मतदारसंघात अधिकाधिक मतदान होण्यासाठी डे टू डे नियोजन केले जाईल. प्रोटोकॉलनुसार सर्वांचा मान-सन्मान राखून समिती नियोजन करेल. यात सर्वांनी सहभागी होत विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही खासदार डॉ. भामरे यांनी केले.