धुळ्यातील वाणी समाजाचे नेते राजेंद्र पाचपुते यांचा समर्थकांसह भाजप प्रवेश
धुळे : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत प्रत्येक बूथवर ५१ टक्के मते घेऊन भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्रजी मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, यासाठी काटेकोर नियोजन करा. त्यांच्या नेतृत्वात विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनाही तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी करत संसदेत पाठवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
धुळे शहरासह जिल्ह्यातील वाणी समाजाचे नेते तथा महाराष्ट्र वाणी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष, मिल परिसरातील आराधना शोरूमचे संचालक, यशस्वी बांधकाम व्यावसायिक राजेंद्र परशुराम पाचपुते यांनी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते. श्री. बावनकुळे यांनी श्री. पाचपुते यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले.
बावनकुळे म्हणाले, की धुळे येथील लाडशाखीय वाणी समाजाचे नेते राजेंद्र पाचपुते यांनी आज आपल्या समाजबांधव व समर्थकांसह केलेला भाजप प्रवेश स्वागतार्ह आहे. श्री. पाचपुते यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करतो व त्यांना शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी पक्षात सतत कार्यरत राहावे. मोदीजींचा नमस्कार तसेच मोदीजींच्या विकसित भारताची गॅरंटी घरोघरी पोहोचवावी. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करताना आणखी संघटनात्मक मजबुती आणावी. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत सर्वांनी झपाटून काम करताना प्रत्येक बूथवर पक्षाच्या उमेदवारांना ५१ टक्के मतदान घेऊन मोदीजी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, याचा निर्धार करावा. तसेच लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनाही तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी करत संसदेत पाठवावे, असे आवाहनही श्री. बावनकुळे यांनी केले.
पाचपुते यांच्यासह यांनीही केला पक्षप्रवेश : राजेंद्र पाचपुते यांच्यासह योगेश येवले,धनराज पाटिल,सुनिल मोरे,संदिप पाटील,योगेश पाटील,तुषार मोरे,पवन बागड,विकी बोरसे,वासु पाटील,राकेश पाटील, गोपाल पाटील, वैभव माळी, शामजी देव,गजाननजी नाकवे,निरंजनजी कोठावदे,चंद्रकांतजी शिनकर,भूषणजी दशपुते, एकनाथ पाटील यांनीही प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे व जिल्हाध्यक्ष आंपळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.
पाचपुते यांचा अल्प परिचय : लाडशाखीय वाणी समाजाचे युवा नेते तथा महाराष्ट्र वाणी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाचपुते हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे जिल्ह्यासह राज्यातील वरिष्ठ नेत्यांशीही चांगले संबंध असून, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक तसेच कापड शोरूमचे संचालक आहेत. 2008 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून धुळे महापालिकेची निवडणूकही लढविली होती. स्वामी विवेकानंद शैक्षणिक सेवाभावी संस्था आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. धुळे क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही ते काम पाहत आहेत. जानेवारी 2019 मध्ये वाणी समाजाच्या 20 हजार महिला भगिनींच्या उपस्थितीत त्यांनी भोगी महोत्सव यशस्वी केला होता.
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात वाणी समाजाचे 45 ते 50 हजार मतदार आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचून भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांना समर्थन मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. डॉ. भामरे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅट्ट्रिक साजरी करणे आनंददायी ठरेल. – राजेंद्र पाचपुते, धुळे