चंदननगर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सागर साळवे, आकाश खुडे उपाध्यक्ष
धुळे : येथील चंदननगर मित्र मंडळाच्या वतीने १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. शिस्तबध्द मिरवणूक आणि मिरवणुकीतील देखाव्यांद्वारे समकालीन सामाजिक, राजकीय प्रश्नांवर भाष्य करण्याची परंपरा चंदननगर मित्र मंडळाची राहिलेली आहे. यावर्षी देखील आगळ्यावेगळ्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा करण्याबाबतचा निश्चय चंदननगर परिसरातील कार्यकर्त्यांनी केला. त्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक बोलवण्यात आली होती. परिसरातील ज्येष्ठ नागरिक गोपाल रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नुतन जयंती उत्सव समिती गठित करण्यात आली.
या समितीत सागर साळवे यांची अध्यक्षपदी, आकाश खुडे उपाध्यक्ष, अभिषेक अहिरे खजिनदार तर सहखजिनदार म्हणून सागर आव्हारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर जयंती उत्सव समितीच्या सदस्यांमध्ये सुमेध सूर्यवंशी, मनोज पिंपळे, मोहन पवार, सम्यक मोरे, संदीप खुडे, रोहित अहिरे, संदीप पवार, रोहित झाल्टे, धम्मपाल बागुल, अविनाश वाघ, रोहित साबरे, सम्यक रणशूर, अनिकेत बागुल, रोहित पवार, राज खुडे, सुमित साबरे, गौरव सूर्यवंशी यांचा समावेश आहे.
बैठकीला माजी नगरसेविका कामिनी पिंपळे, रंजना रणशुर, वनिता ढीवरे, ज्योती जगदेव, दीप्ती साळवे, माजी नगरसेवक सिद्धार्थ जगदेव, महेश अहिरे, राजेंद्र जाधव, किशोर सोनवणे, चेतन अहिरे, ऋषी ठोसर, महेश चत्रे, सचिन ठोसर, राजेश साळवे, स्वप्निल सोनवणे, धम्मपाल सूर्यवंशी, विक्की कदम, अमोल थोरात, अजिंक्य मोरे, स्वप्नील चव्हाण, भूषण वाघ, भूषण नाईक, सौरभ साळवे, केतन साळवे, शत्रुघ्न शिंदे, आदित्य खुडे, अंकित अहिरे, सचिन वाघ, संदेश सोनवणे, गणेश जाधव, सुनील चौधरी, गणेश पवार, मुन्ना बर्वे, दीपक जगदेव, राहुल वाघ, योगेश साळवे, सिद्धार्थ साळवे, मनोज साळवे आदी उपस्थित होते. सिद्धांत बागुल यांनी आभार मानून बैठकीचा समारोप केला.