महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सव समीती अध्यक्षपदी राहुल जाधव
नंदुरबार : येथील समता युवा मंचातर्फे महात्मा ज्योतीबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. समता युवा मंच उत्सव समीतीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी समाज बांधव, विविध पक्ष-संघटनांचे पदाधीकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते राहुल शांताराम जाधव यांची उत्सव समीतीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष राहुल जाधव यांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी, माजी नगराध्यक्ष रविंद्र अशोक पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
उत्सव समिती उपाध्यक्षपदी राहुल दौलत रामराजे, सचीव जवाहर पवार, खजीनदार भैय्या बाविस्कर यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला ज्येष्ठ सल्लागार सुभाष पेंढारकर, सुभाष पानपाटील, उत्सव समीती कायदेविषयक सल्लागार ॲड. प्रेमानंद ईंद्रजित, राम साळुंखे, रवी रगडे, भैय्या बावीस्कर, सचीन पिंपळे, किरण गवळे, विकास सोनवणे, मुकेश घोडसे, भीमराव पवार, गौरव महीरे , रूपेश बत्तीसे, गणेश मोरे, आकाश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.