मतदान कार्ड हरवले आहे? अपडेट करायचे आहे? नवीन काढायचे आहे? मग हे वाचा…
मतदानाचा अधिकार नागरिकांचा असा अधिकार आहे, जो त्यांच्यापासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. (अपवादात्मक स्थितत तो काढला जाऊ शकतो.) मत देण्यासाठी व्होटर आयडी कार्ड असणे गरजेचे नाही. सरकारने अन्य अकरा ओळखपत्रांना मान्यता दिली आहे, ज्यातले एखादे दाखवून तुम्ही मत देऊ शकता, पण त्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असायला हवे. यादीत नाव समाविष्ट करणे म्हणजेच मतदान कार्ड काढणे होय.
व्होटर आयडी कार्ड म्हणजेच मतदार ओळखपत्र होय. हे एक फोटो ओळखपत्र आहे; जे दाखवून आपण मतदान करू शकतो. याला इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजे EPIC म्हणूनही ओळखले जाते. या कार्डसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. घरबसल्या ऑनलाईन अर्ज केल्यास तुम्हाला कुठल्या सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागणार नाहीत, आणि तुमचे काम देखील काही मिनिटांतच होईल.
असा करा ऑनलाईन अर्ज :
ऑनलाईन अर्जासाठी https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवर जा. या वेबसाईटवर तुमचे अकाऊंट असेल तर Login करा आणि अकाऊंट नसेल तर Sign-Up या पर्यायावर क्लिक करा.
Sign-Up बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि दिलेला Captcha टाकून Continue बटनावर क्लिक करा.
यावेळी तुमचे नाव, आडनाव आणि तुम्हाला हवा असलेला एकच पासवर्ड दोन वेळा टाकल्यावर Request OTP बटनावर क्लिक करा. तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर आणि ईमेलवर दोन वेगवेगळे OTP प्राप्त होतील. दोन्ही OTP योग्य पध्दतीने टाकल्यावर तुमचे अकाऊंट तयार होईल. त्यानंतर नव्याने Login करा आणि Home Page ओपन होईल.
डावीकडे सगळ्यात पहिला पर्याय, म्हणजे रजिस्टर अॅज न्यू एलेक्टर/वोटर वर क्लिक करा आणि फॉर्म 6 भरा, जो मतदार म्हणून नोंदणीसाठी आवश्यक असतो. तुम्ही नवीन मतदार असाल तर Fill Form 6 वर क्लिक करा. अपडेट करायचे असेल तर Fill Form 8 वर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.
फॉर्म उघडल्यावर राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, नाव, जन्मतारीख, सध्याचा पत्ता, कायमचा पत्ता अशी माहिती आणि पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करा.
पुरावा म्हणून जे कागदपत्र जोडणार आहात त्यावर क्लिक करा आणि त्याची कॉपी अपलोड करा.
त्यानंतर स्क्रीननवर दिलेला कॅप्चा कोड टाका. फॉर्म प्रीव्ह्यू करायला विसरू नका, कारण एकदा सबमिट केल्यावर मग काही बदल करता येणार नाही. सगळं ठीक असेल तर शेवटी सबमिटवर क्लिक करा.
सगळ्या गोष्टी नमूद केल्यावर तुमच्या मेलबॉक्समध्ये एक ईमेल येईल आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेजही येईल ज्यात अॅक्नॉलेजमेंट नंबर असेल. तो वापरून, तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस ट्रॅक करू शकता.
सगळ्या गोष्टी योग्य असतील तर तुम्हाला कमीत कमी सात दिवसांनी व्होटर आयडी कार्ड मिळेल. अर्थात जास्तीत जास्त किती वेळ लागेल याची काही मर्यादा नाही.
तुमच्या मनात काही शंका असतील तर 1950 या नंबरवर कॉल करू शकता किंवा निवडणूक आयोगाच्या नॅशनल ग्रिव्हन्सेन्स सर्विस पोर्टलवर जाऊन माहिती पाहू शकता.
निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाईन नावाचे एक मोबाईल अॅपही तयार केले आहे. ज्यात व्होटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही याच सगळ्या प्रक्रियेद्वारा व्होटर आयडी कार्डसाठी अर्ज करू शकता.
मतदान कार्ड काढण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? : अर्ज करणारी व्यक्ती भारतीय असायला हवी. त्या व्यक्तीचे वय एक जानेवारी, एक एप्रिल, एक जुलै किंवा एक ऑक्टोबरला 18 वर्षं पूर्ण असायला हवे. काही दिवसांतच ते 18 वर्षांचे होणार असतील, तरीही ते अर्ज करू शकतात. ज्या मतदार संघात मतदार म्हणून नोंदणी करायची आहे, तुम्ही तिथले रहिवासी असायला हवे.
व्होटर आयडी काढण्यासाठी सगळ्यांत आधी फॉर्म नंबर 6 भरावा लागतो. मतदार यादीत नाव नोंदणीसाठी हा फॉर्म भरावा लागतो. या अर्जासोबत पासपोर्ट साईझ फोटो, वयाचा आणि पत्त्याचा दाखला द्यावा लागतो. जे पहिल्यांदा व्होटर आयडी कार्ड काढत असतील, ते जन्माचा दाखला, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचा दाखला ज्यावर जन्मतारीख लिहिली असते, अशी कागदपत्रे जोडू शकतात. निवडणूक आयोगाने यासाठी ‘Others’ म्हणून पर्यायही दिला आहे. म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथली काही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही तुमच्या पत्त्यावर आलेले एखादे पत्रही पुरावा म्हणून जोडू शकता.
बेघर नागरिकही मतदान कार्ड काढू शकतात. त्यासाठी फॉर्म नंबर 6 भरताना एक डिक्लेरेशन द्यावे लागते. म्हणजे कोणी फुटपाथवर किंवा फ्लायओव्हर खाली राहात असेल तर त्याची माहिती ते देऊ शकतात.
त्यानंतर त्या विभागातले बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजे बीएलओ कमीत कमी तीनदा त्या जागेला भेट देऊन ती व्यक्ती त्याच ठिकाणी राहते की नाही याची खात्री करून घेतात. ही प्रक्रिया पार झाली तर अर्जदाराला व्होटर आआयडी कार्ड मिळते.
ऑफलाईन अर्जासाठी तुम्हाला फॉर्म 6 च्या दोन कॉपी हाताने भराव्या लागतात. इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर किंवा बीएलओ पातळीवरच्या अधिकाऱ्यांकडून हा फॉर्म मोफत मिळतो.
त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही स्वतःच हा फॉर्म संबंधित इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर किंवा असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर कडे जमा करू शकतात किंवा पोस्टाने पाठवू शकता. तुम्ही बूथ पातळीवरील अधिकाऱ्याकडेही हा फॉर्म देऊ शकता.