संत झुलेलाल जयंतीनिमित्त सिंधी समाजातर्फे रक्तदान शिबीर, महिलांनीही केले रक्तदान
धुळे : चेट्री चंड दिवस, सिंधी दिवस, सिंधी नववर्ष, संत झुलेलाल जयंतीनिमित्त धुळे शहरात सिंधी समाजातर्फे साक्री रोडवरील सिंधी सेंट्रल पंचायत भवनात बुधवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांनी देखील रक्तदान केले.
सिंधी समाजार्फे चेट्री चंड अर्थात सिंधी दिन विविध कार्यक्रांनी साजरा करण्यात आला. बुधवारी सकाळी संत झुलेलाल यांच्या मूर्तीला शाही स्नान घालण्यात आले. त्यानंतर महिलांची दुचाकी रॅली निघाली. या रॅलीने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले. तर रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक तरूणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. दरम्यान, सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रात्री भंडारा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सिंधी समाज अध्यक्ष गुलशन उदासी, प्रकाशलाल छेतिया, सुरेश कुंदनानी, किशोर डियालाणी, सुरेश दंडवाणी, अनिलकुमार पोपटाणी आदींसह सर्व पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.
संत झुलेलाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्यात दि. 3 रोजी भगवान झुलेलाल यांच्या जीवनावर आधारित सिनेमा दाखविण्यात आला. 4 रोजी रांगोळी स्पर्धा, सिंधी डिश स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा झाली. 5 रोजी आरती, सजावट स्पर्धा पार पडली. तसेच छप्पन भोग दाखवण्यात आला. 6 रोजी सिंधी स्वीट डिश, सलाद डेकोरेशन स्पर्धा, सिंधी टॅलेंट शो कार्यक्रम झाला. 7 रोजी झुलेलाल मॅरेथॉन, रंगभरण, सवाल-जबाब स्पर्धा घेण्यात आली. 8 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, लेडीज टॅलेंट शो कार्यक्रम झाला. 9 रोजी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तर 11 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता पूज्य बहराणा साहेब विसर्जन होणार आहे. लेडीज टॅलेंट शो होणार आहे. 9 एप्रिलला पहाटे 5 वाजता लालसाई यांच्या प्रभात फेरीचे आयोजन भगवान झुलेलाल मंदिरापासून करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता पूज्य बहराणा साहेब यांची शोभायात्रा निघेल.