भुयारी मार्ग झाला, आता सर्वांनी मतदान करा!, मिल परिसरातील मतदारांना अनुप अग्रवाल यांचे आवाहन
धुळे : शहरातील दसरा मैदान ते शासकीय दूध डेअरी रोड दरम्यान रेल्वे रुळाखालून दुसरा भुयारी मार्ग तयार करण्यात आला. दुचाकी, तीनचाकी आणि पादचाऱ्यांसाठी असलेला हा मार्ग सोमवारी खुला करण्यात आला. धुळे शहरात आपलं मतदान अडीच लाख असताना केवळ 80 ते 90 हजार मतदार संख्या असलेले निवडून येतात, अशी खंत व्यक्त करीत, शहरातील सर्व मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन भाजपचे धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांनी केले.
भारताला जगातली तिसरी महाशक्ती बनवायचे असेल, धुळे शहराला मथुरा, काशी सारखे पवित्र संपन्न शहर बनावये असेल तर तुम्हाला शंभर टक्के मतदानासाठी बाहेर पडावे लागेल. येत्या 20 मे रोजी आपली एकजूट दाखवून द्या. मतदानासाठी सर्वांनी बाहेर पडा. महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी मिलपरिसर, शासकीय दुध डेअरी परिसरातून किमान 80 टक्के मतदान झालेच पाहिजे असा निर्धार करा, असे आवाहन अनुप अग्रवाल यांनी केले.
धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी रोड ते दसेरा मैदान दरम्यान रेल्वे क्रॉसिंगवर परिसरातील नागरीकांच्या सुविधेसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या भूयारी मार्ग पाहणी आणि भाजपच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी अनुप अग्रवाल बोलत होते. याप्रसंगी खासदार तथा महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे, धुळे लोकसभा क्षेत्र प्रमुख माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, रोहन भामरे, महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सारीका अग्रवाल, प्रविण अग्रवाल, माजी सभापती सुनिल बैसाणे, अजय अग्रवाल तसेच परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना भाजपा नेते अनुप अग्रवाल पुढे म्हणाले की, धुळे शहराचे एकुण 3 लाख 30 हजार मतदान आहे. त्यात 80 ते 90 हजार मतदान एका समुदायाचे असून आपले सुमारे अडीच लाख मतदान आहे. मात्र या अडीच लाख वाल्यांना 80 हजार वाला भारी पडतो आहे. कारण आपण मतदानाला बाहेरच पडत नाही. वाट बघतो आपण वाट.. आणि ते सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लाईन लावतात. त्यांचे रात्री 8 वाजेपर्यंत मतदान चालते आणि आपल्या भागात सायंकाळी 5 वाजेलाच मतदान केंद्रांवर सामसुम झालेली असते. आपण मतदानासाठी खूपच उदासीन असतो. ही उदासीनता आता सोडावी लागेल तरच आपले विकासाचे स्वप्न पुर्ण होईल. आपले अस्तित्व कायम राहील. म्हणून सर्वांनी येत्या 20 मे रोजी सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडा.
2014 मध्ये जनतेने देशात परिवर्तन घडविले. तुम्ही दिलेल्या एका मतामुळे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले आणि 10 वर्षात मोठा बदल झालेला आज दिसतो आहे. हायवे, रस्ते तयार झाले. पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प पुर्ण झाले. रेल्वे मार्गाचे काम सुरु झाले. पुर्वी लोडशेंडीग होती आता होते का, याचा विचार करा आणि मतदानाला बाहेर पडा. मातृशक्ती ही मोठी शक्ती आहे. मायमावल्यांनी ठरवले तर घरातील एक-एक मताचे दान तुम्ही करा. त्याबदल्यात विकासाचे फळ डॉ. सुभाष भामरे हे परत देतील हा माझा तुम्हाला शब्द आहे.
नवीन भुयारी मार्गाचे श्रेय सारीकाताई, प्रविण अग्रवाल यांचेच : मिल परिसरातील दूध डेअरी रस्त्याला लागून लक्ष्मीवाडी जवळ रेल्वे रूळ असल्याने रेल्वे फाटक होते. मात्र रेल्वे प्रशासनाने ते रेल्वे फाटक बंद करून रहिवाशांसाठी एक भूयारी मार्ग तयार करून दिला. तो भूयारी मार्ग नागरीकांसाठी मोठा अडचणीचा झाला. याठिकाणाहून जात असताना मोठा फेरा मारून जावे लागत होते. शिवाय लहान वाहनांसाठी हा मार्ग रात्री धोक्याचा देखील बनला होता. अंधारात लुटमारीचे प्रकार सुरू झाले होते. नागरीकांसह परिसराच्या नगरसेविका तथा महापालिकेच्या माजी महिला बालकल्याण समिती सभापती सारीका अग्रवाल व सामाजिक कार्यकर्ते प्रविण अग्रवाल यांनी खा. डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेवून पर्यायी मार्ग तयार करण्याची मागणी केली. नागरीकांच्या मागणीची तत्काळ दखल घेत खा. डॉ. भामरे यांनी रेल्वे विभागास युद्ध पातळीवर पाठपुरावा केला. निधी मंजूर करून घेत 4 महिन्यात कामही पूर्ण केले. सारीका अग्रवाल आणि प्रविण अग्रवाल यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा नवीन भुयारी मार्ग तयार झाला. त्याचे श्रेय त्यांचेच असल्याचे यावेळी भाजपा नेते अनुप अग्रवाल यांनी सांगितले.
जेसीबीने फुलांची उधळण, नागरीकांनी केला आनंदोत्सव : धुळ्यातील शासकीय दूध डेअरी रोड ते दसेरा मैदान दरम्यान रेल्वे क्रॉसिंगवर परिसरातील नागरीकांच्या सुविधेसाठी नव्याने तयार करण्यात आलेला भूयारी मार्ग गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला सुरू करण्यात आला. जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा नेते प्रविण अग्रवाल यांच्यासह परिसरातील नागरीकांनी खा. डॉ. सुभाष भामरे आणि भाजपाचे शहर विधानसभा अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यावर थेट जेसीबीतून फुलांची उधळण करीत नवीन मार्ग तयार करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला यांची विशेष उपस्थिती : या कार्यक्रमाला पिंकी अग्रवाल, कोमल अग्रवाल, आरती अग्रवाल, मोहीनी गोंड, रुपाली अग्रवाल, राघवन ताई, सागीता अग्रवाल, जयश्री जयसवाल, सोनू पंजाबी, मनोज राघवन, रविंद्र शिंदे, विशाल सोनवणे, रवि पवार, डॉ. चिंगरे, कैलाश गर्ग, योगेश खंडेलवाल, अनिल अग्रवाल, निलेश अग्रवाल, पवन अग्रवाल, विनोद अग्रवाल, गोकुल परदेशी, मुकेश सोनार, रमाकांत सोनार, महेश अग्रवाल, मयूर अग्रवाल, गोपाल अग्रवाल, कपिल शर्मा, नरेंद्र अग्रवाल, शरद खंडागळे, अमोल चिंचोलीकर, अरविंद सुडके, भालचंद्र भालेराव, अशोक बाविस्कर, सुभाष चिंचोलेकर, प्रकाश भदाने, सुरेश कन्नोरकर, नाना पाटील, डि. के. सूर्यवंशी, सुमनबाई सूर्यवंशी, लताबाई वसंत पाटील, के. एस. पांडे, चंद्रकांत कोतकर, एन. पी. वाणी, प्रताप पाटील, रवी पाटील, भीमराव शिंदे, रामदास सोनवणे, अशोक पगारे, मुरलीधर ढेरे, सुधाकर अमृतकर, रामेश दगडू देव, गोरव शिंदे, हर्षल शिंदे आदींची विशेष उपस्थिती होती.