बाबासाहेबांना अभिवादनासाठी जनसागर उसळला
धुळे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त शहर पोलिस ठाण्याजवळील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रविवारी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा लाभलेल्या संदेश भूमिसाठी महाले प्रतिष्ठानतर्फे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराचे जयंतीनिमित्त लोकार्पण करण्यात आले. यावेळी महाले प्रतिष्ठानचे सतिष महाले, संदेश भूमीचे प्रणेते आनंद सैंदाणे यांच्यासह बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला बुद्धवंदना झाली. त्यानंतर महामानवावर पुष्पवृष्टी करत महावंदन करण्यात आले. विविध संघटनांकडून विधायक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. मध्यरात्री बाराला शहरातील विविध भागांत फटाके फोडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. साक्री रोडवरील भीमनगर भागात माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, धनराज शिरसाठ, किरण धिवरे, पूनमताई शिरसाठ यांच्या विशेष नियोजनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाजवळ सकाळपासूनच जनसागर लोटला. आंबेडकरप्रेमी, अनुयायांसमवेत अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष, नागरिकांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सायंकाळीही भीनगरसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकाजवळील पूर्णाकृती स्मारक परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाईक रॅली काढण्यात आली. शहरात डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला. लोकजनशक्ती पार्टीतर्फे (राविलास पासवान) डॉ. आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकासोर रविवारी 14 एप्रिलला पहाटे चहा, कॉफी वाटप झाले.
भाजपा धुळे महानगराच्या वतीने विनम्र अभिवादन : भारीतय जनता पार्टी, धुळे महानगराच्या वतीने धुळे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे व भाजपा महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, पदाधिकारी, लोकप्रतिनीधी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व तळागळातील दिन दलितांच्या उध्दारासाठी संपुर्ण जिवन वेचनारे, अद्वितीय, अलौकीक नेतृत्त्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने महामानव होते. भारतीय नागरिकांना समान अधिकार मिळवून दिला व आर्थिकदृष्ट्या मागसलेल्या जनतेच्या उत्थानासाठी संपुर्ण जिवन व्यतीत केले. त्यांचे अविस्मरणीय कार्य दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले आहे, असे प्रतिपादन डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते विजय पाच्छापुरकर, माजी महापौर चंदु सोनार, प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी, प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामण गवळी, सरचिटणीस जितु चौवटिया, यशवंत येवलेकर, चेतन मंडोरे, जिल्हा प्रवक्ते शाम पाटील, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष आकाश परदेशी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ, माजी उपमहापौर कल्यणीताई अंपळकर, महानगर उपाध्यक्ष संजय बोरसे, दिलीप शितोळे, विक्रम थोरात, अनिल थोरात, राजेंद्र खंडेलवाल, मनोज शिरोडे, कमलाकर पाटील, भगवान देवरे, पप्पु ढापसे, योगेश मुकुंदे, जयवंत वानखेडकर, माजी नगरसेवक राजेश पवार, सुनिल बैसाणे, योगिता बागुल, अमोल मासुळे, विधानसभा विस्तारक, प्रथमेश गांधी, चिटणीस पंकज विंचू, शरद चौधरी, प्रकाश पोळ, सुनिल कपिल, सोशल मिडिया प्रमुख पवन जाजू, सागर चौधरी, मंडल अध्यक्ष बबनराव चौधरी, योगेश पाटील, ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष शिवाजीराव काकडे, आनंदा चौधरी, संतोष खंडेलवाल, नंदु ठोंबरे, शरद बिरारी, कालिदास पोतदार, शिवदास बडगुजर, युवा मोर्चा सरचिटणीस पंकज धात्रक, महिला मोर्चा सरचिटणीस मोहिणी धात्रक, रंजना पाटील, उमा कोळवले, संगिता राजपुत, वंदना सातपुते, भाजपा कार्यालय प्रमुख प्रकाश उबाळे, जिल्हा सह-प्रसिध्दी प्रमुख अनिल सोनार, आदींसह भाजपाचे लोकप्रतिनीधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील, सचिव मनोज वाघ, अभियंता चंद्रकांत ओगले, अनिल साळुंखे, आमदार कुणाल पाटील, आमदार फारूक शहा, माजी आमदार राजवर्धन कदबांडे, दलित नेते वाल्मिक दामोदर, ज्येष्ठ नेत्या मीनाताई बैसाणे, युवानेते भैय्या पारेराव, काँग्रेस नेते युवराज करनकाळ, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुर रहेमान, लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, शोभा चव्हाण, कुंदन खरात, मधुकर शिरसाठ, अरविंद निकम, शशिकांत वाघ, संजय जाधव, सुधीर जाधव, चंद्रकांत सत्तेसा, प्रशांत बागूल, योगीता बागुल, राजेंद्र इंगळे, सुधाकर बेंद्रे, अशोक सुडके, राहुल निकम, शिवसेनेचे हिलाल माळी, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले, ज्येष्ठ नेते जोसेफ मलबारी, राजेंद्र जिरेकर, छोटू थोरात, खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, मंगेश जगताप, राजेंद्र चौधरी, रणजित भोसले, संदीप बैसाणे, शरद गोसावी, बिपिनचंद रोकडे, राज चव्हाण, हरिश्चंद्र लोंढे, संजय बैसाणे, मोहन मोरे, शंकर खरात, मनीबाबा खैरनार, देवीदास जगताप, मधुकर निकम, आनंद जावडेकर, भगवान वाघ , सुनिल बैसाणे, योगेश ईशी, शशिकांत वाघ, शंकर खरात, योगेश जगताप, आबा खंडारे, गुलाब माळी, नागसेन बोरसे, संदीप सूर्यवंशी, कैलास मराठे, विनोद जगताप, भरत मोरे, चंद्रकांत महाजन, संदीप पाटोळे, निंबा मराठे, संजय भामरे, वंदना भामरे, कुंदन खरात, संभाजी पगारे, विलास पाटील, बानुताई शिरसाठ, वाल्मिक जाधव, यमुनाबाई जाधव, शोभाताई बैसाणे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार पंकज पाटील, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक संतोष जोशी, अव्वल कारकून विशाल मोहिते, अव्वल कारकून श्रीमती माया बिराडे यांचेसह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.