बाईक रॅलीतून जय श्रीरामचा नारा
धुळे : श्रीराम नवमीनिमित्त धुळे शहरातून निघालेल्या भव्य बाईक रॅलीने धुळेकरांच लक्ष वेधून घेतलं. श्रीरामभक्त अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात निघालेल्या या बाईक रॅलीमुळ संपूर्ण धुळे शहर भगवामय झालं होतं. दरम्यान, आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरातही रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
श्रीराम भक्त अनुप अग्रवाल यांच्या पाठबळाने व श्रीराम नवमी उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष योगेश भोकरे यांच्या संकल्पनेतून बुधवारी संतोषी माता चौकातून भगवा बाईक रॅली काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते रथावरील प्रभू श्रीरामलल्लांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली. या रॅलीत खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजप विधानसभा संघटक अनुप अग्रवाल, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पै, जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, बेटी बचाव बेटी पढावच्या अल्पा अग्रवाल, प्रभा परदेशी, भाजप महिला जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट, मोहिनी गौड, माजी सभापती शितल नवले, देवेंद्र सोनार, अमोल मासुळे, आकाश परदेशी, संजय वाल्हे, मनोज मोरे, अशोक सुडके यांच्यासह हजारो श्रीराम भक्त सहभागी झाले होते.
दरम्यान, आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरातही महाआरती करण्यात आली. श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर रांगा लावल्या होत्या.