भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मागणीला यश
धुळे : आगामी लोकसभा सर्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने शहरात सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या स्तरावर मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने भाजपा धुळे महानगर सुद्धा सर्व ताकतीने आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सूक्ष्म नियोजन करत असून धुळे शहरातून मतदानाचा टक्का कसा वाढेल याची सर्वार्थाने प्रयत्न करीत आहे.
त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदान पद्धतशीर व पारदर्शकपणे व्हावे यासाठी सुद्धा भाजपा धुळे ने विशेष कामगिरी केली आहे. मा. जिल्हाधिकारी सो. यांच्याशी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्र अंपळकर यांनी वारंवार भेट घेऊन निवेदनाद्वारे आपले म्हणणे मांडले. काही विशिष्ट जाती संप्रदायाकडून आपल्या वेगळ्या पेहराव्यामुळे हेतू पुरस्कर आपली ओळख लपवण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो हाच प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर आलेल्या प्रत्येक मतदात्याची ओळख पडताळणी करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर सक्षम महिला अधिकाऱ्यांची शासन स्तरावरून नेमणूक करण्यात येणार असून मतदानासाठी आलेल्या प्रत्येक महिला मतदारांची संपूर्ण ओळख पटल्याशिवाय मतदानाचा हक्क बजावू दिला जाणार नाही. अशी खात्री माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लिखित पत्राद्वारे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांना दिली.
हेही वाचा
शामकांत सनेर यांची नाराजी दोन दिवसात दूर करणार!
देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपच्या हातात पुन्हा सत्ता द्या! भाजप प्रवक्ते प्रदीप पेशकार यांच आवाहन
धुळे लोकसभा मतदारसंघात तिसरी आघाडी, राडा करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना चोप
भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला नाही! डॉ. सुभाष भामरेंचे स्पष्टीकरण
Dhule Loksabha भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन