नंदुरबार लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्या प्रचाराचा झंजावात
धुळे : नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी झटत असलेल्या खासदार डॉ. हिनाताई गावीत यांना पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असं आवाहन शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी शिरपूर तालुक्यातील मतदारांना केलं. महायुतीच्या उमेदवार खासदार हिनाताई गावीत यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.
आमदार पावरा म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात सहा आदिवासीबहुल विधानसभा मतदारसंघ आहेत. विकासापासून दूर राहिलेल्या आदिवासी बंधू-भगिनींना विकासाच्या मुख्य प्रवाहात नेऊन त्यांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्याचे काम भारतीय जनता पक्ष विविध योजनांच्या माध्यमातून करीत आहे. या कामासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीश भाई पटेल, मी स्वतः आणि भाजपचे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करीत आहोत. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून आदिवासींच्या विकासासाठी झटत असलेल्या डॉ.हिना गावित यांनाच पुन्हा तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, अस आवाहन आमदार काशीराम पावरा यांनी केलं.
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आ. काशिराम पावरा, लोकसभा प्रमुख तुषार रंधे, माजी सभापती सत्तारसिंग पावरा, आदीवासी आघाडीचे प्रमुख जयवंत पाडवी, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, युवा नेते राहुल रंधे, मार्केट सभापती के. डी. पाटील, सभापती सरलाबाई पावरा, कोडीदच्या सरपंच आरतीताई पावरा , पंचायत समिती सदस्या सुशीलाबाई पावरा, जिल्हा परिषद सदस्या अनिता पावरा, रतन पावरा, सामाजिक कार्यकर्ते नारायण पावरा, योगेश बादल, जगन टेलर, कांतीलाल पावरा, सुकलाल महाराज, रमन पावरा, भास्कर बोरसे, बोराडीचे सरपंच सुखदेव मालचे, ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील उपस्थित यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.