देश तोडण्याचे आणि लुटण्याचे काँग्रेस चे मनसुबे उघड झालेत : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई : काँग्रेस चे सल्लागार सेम पित्रोदा यांनी अमेरिकेचा वारसा कायदा काँग्रेस ने भारतात लागू करण्याचा काँग्रेस ल सल्ला दिला आहे.त्यानुसार सामान्य माणसाने मोठ्या कष्टाने कमवलेली संपत्ती त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना न देता त्यातील 55 टक्के संपत्ती शासनाने ताब्यात घेण्याचा अमेरिकेचा कायदा भारतात राबविण्याचे काँग्रेस चे स्वप्न आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही. देशवासीयांना लुटण्याचा काँग्रेसचा इरादा पित्रोदा यांनी उघड केला आहे. सत्तेत असताना भ्रष्टाचार करून देशाला लुटण्याचा आणि आता मृत्यूनंतर ही सामान्य माणसाची संपत्ती लुटण्याचा अजब अमेरिकी कायदा आपल्या देशात लागू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस च्या लूट बेछूट वृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो.असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
दक्षिण गोव्याचे काँग्रेस चे उमेदवार कॅप्टन विरियटो फर्नांडिस यांनी गोव्यात भारतीय संविधान जबरदस्ती लागू आहे .त्यांना भारतीय संविधान लागू करू नका आणि त्यांना दुहेरी नागरिकत्व द्यावे ही केलेली मागणी देशात फूट पडणारी आहे.राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून भारत तोडो ची बीजे पेरली का? त्याचे परिणाम स्वरूप गोव्यात काँग्रेस उमेदवार संविधान विरोधी गरळ ओकत आहे. काहीही बरळत आहेत. आपल्या भारत देशाला एकच संविधान आहे. जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे.मग गोव्याला भारतीय संविधान नको दुसरे संविधान पाहिजे ही काँग्रेस उमेदवारांची मागणी काँग्रेस चा संविधानविरोधी चेहरा उघड करीत आहे.असा आरोप ना. रामदास आठवले यांनी केला.