छत्रपती शिवरायांना अभिवादन करत महायुतीच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रॅली
धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष रामराव भामरे हे भारतीय जनता पक्ष- शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून येत्या सोमवारी (ता. २९) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्त रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
लोकसभेच्या धुळे मतदारसंघातून यापूर्वी २०१४ व २०१९ अशा दोन वेळा झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपतर्फे खासदार डॉ. भामरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. पक्षाने त्यांच्या कार्यकर्तृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. महायुतीतर्फे खासदार डॉ. भामरे सोमवारी (ता. २९) आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. येथील आग्रा रोडवरील मनोहर चित्रपट गृहाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले जाईल. यानंतर तेथून वाद्यांच्या गजरात तसेच घोषणांच्या दणदणाटात आग्रा रोड-कराचीवाला खुंट, जुनी महापालिका मार्गे राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले जाईल. यानंतर खासदार डॉ. भामरे शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कार्यालयात आपला अर्ज दाखल करतील. तत्पूर्वी, प्रचार सभा होईल.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे, आमदार अमरिशभाई पटेल, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, धुळे लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे लोकसभा समन्वयक नारायण पाटील, धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, भाजपचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख राम भदाणे, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, शिवसेनेचे धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले, धुळे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, धुळे महानगरप्रमुख संजय वाल्हे, संजय गुजराथी, समाधान शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, प्रांतिक सदस्य किरण शिंदे, किरण पाटील, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित शिसोदे, धुळे जिल्हाध्यक्ष सुमित पवार, मनसेचे धुळे जिल्हाप्रमुख ॲड. दुष्यंतराजे देशमुख, धुळे महानगरप्रमुख संजय सोनवणे, डॉ. मनीष जाखेटे, उत्तर महाराष्ट्र सचिव प्राची कुलकर्णी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रदेश उपाध्यक्ष वाल्मीक दामोदर, प्रदेश सचिव ॲड. महेंद्र निळे, उत्तर महाराष्ट्र कोशाध्यक्ष एस. आर. बागूल, जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, राजूबाबा शिरसाट, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नयना दामोदर, शहराध्यक्षा सरला निकम, लोकजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप साळवे, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा शोभाताई चव्हाण, जिल्हा महासचिव कुंदन खरात, मधुकर चव्हाण, धुळ्याचे माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या डॉ. माधुरी बोरसे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, धुळे महानगर जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हा, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य यांच्यासह महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरपालिकांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बाजार समित्या आदी सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित असतील.
धुळे मतदारसंघातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव शहर, मालेगाव बाह्य, बागलाण या सहाही विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या घटक पक्षांतील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी काढण्यात येणाऱ्या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार डॉ. भामरे यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.