डॉ.भामरेंना तीन लाख 32 हजांराचे मताधिक्क्य देणार : गिरीश महाजन
धुळे : धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेल्या रॅलीच्या गर्दीने उच्चांक मोडले. डॉ. सुभाष भामरे हे पाणीवाले बाबा आहेत. त्यांना यावेळी 3 लाख 32 हजारांचे मताधिक्क्य देणार असा शब्द पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला. धुळे महापालिका निवडणुकीच्यावेळी 50+ चा शब्द दिला होता. तो खरा ठरवला. त्यावेळी गोटेंना राग आला होता. यावेळी देखील मी 3 लाख 32 हजारांचे मताधिक्क्य खा. डॉ. भामरेंना देण्याचा शब्द देत असल्याचे महाजन म्हणाले. यावेळी उपस्थितांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.
भाजपा-सेना महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. डॉ. सुभाष भामरे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मनोहर टॉकीज जवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शिवरायांना अभिवादन करत गगनभेदी घोषणा भाजपा महायुतीच्या पदाधिकार्यांनी दिल्या. महाविजय रथमधून सवार होत खा. डॉ. भामरे सोबतच ना. गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, माजी मंत्री आ. जयकुमार रावल आणि महामंत्री विजय चौधरी, राजवर्धन कदमबांडे, साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत, मनसेचे जयप्रकाश बाविस्कर, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, सतीश महाले, गजेंद्र अंपळकर आदी नामांकन भरण्यासाठी आग्रारोडने निघाले. जागो-जागी त्यांच्यावर उत्सफुर्तपणे पुष्पवृष्टी करण्यात आली. महापालिकेजवळ हा महाविजय रथ आल्यानंतर मनसेच्यावतीने मोठा पुष्पहार घालुन या नेत्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जिजामाता शाळेजवळ रॅलीचे रुपांतर महासभेत झाले. यावेळी ना. गिरीश महाजन यांनी तुफान टोलेबाजी केली. ना. महाजन यांनी सुरुवातीलाच खा. डॉ. भामरेंचा उल्लेख पाणीवाले बाबा असा केला.
गिरीश महाजन म्हणाले की, आजची रॅली अभुतपूर्व असल्याचे सांगत एव्हढी मोठी रॅली मी पहिल्यांदाच बघितली. जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी मोठी रॅली निघाली होती. जळगावची रॅली राज्यातील सर्वात मोठी रॅली ठरली होती. परंतु धुळ्यातील रॅली पाहून जळगावही फिकं पडतं की काय अशी स्थिती आहे. खा. डॉ. भामरे, भाजपा आणि मोदींविषयी प्रेम असल्याने उन्हा-तान्हात मोठ्या संख्येने जनता रॅलीत सहभागी झाली आहे. मोदींनी दहा वर्षात शेतकरी, महिला आणि इतर घटकांचे प्रश्न सोडविले आणि 400 पारसाठीची तयारी सुरु आहे. राममंदिरचे श्रेय जनतेलाच आहे. कारण या जनतेनेच भाजपचे 303 खासदार निवडून दिले. त्यामुळेच राममंदिर झाले. काश्मिमधून 370 हटले. देशासाठी आणि आपल्या श्रद्धास्थानासाठी मोदींना पंतप्रधान करायचे आहे. म्हणून खा. डॉ. भामरेंना आपल्याला निवडून द्यायचे आहे. खा. डॉ. बाबांनी खूप काम केले आहे. सुलवाडे अक्कलपाडा पुर्ण केले आहे. हा देश सुपर पॉवर करण्यासाठी आपल्याला मोदी हवे आहेत. देशाची अर्थव्यवस्था 11 वरुन पाच नंबरवर आली. येत्या पाच वर्षात ती क्रमांक 3 वर जाईल. पंतप्रधान मोदींमुळे सिमेवरचा गोळीबार थांबला. पाकणे खोड्या करणं थांबवलं. खा. डॉ. सुभाष भामरेंना पहिल्यांदाच लोकसभेत 1 लाख 32 हजारांचे मताधिक्क्य मिळाले. दुसर्यांदा 2 लाख 32 हजारांचे मताधिक्क्य दिले. आता किती मताधिक्क्य देणार अशी विचारणा ना. महाजन यांनी करताच जनतेतून 4 लाख 32 हजार असा आकडा पुढे आला. मी धुळ्यात महापालिका निवडणुकीच्यावेळेस भाजपाचे 50+ येणार असे सांगितले. त्यावेळी गोटेंना राग आला होता. मी 4 लाख 32 हजार सांगत नाही तो आकडा जळगाव रावेरसाठी ठेवला आहे. धुळ्यातून खा. डॉ. भामरेंना 3 लाख 32 हजाराचे मताधिक्क्य देणार त्यासाठी आपल्याला सर्वांना मेहनत घ्यायची आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवू नका, असेही ते म्हणाले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी देशाचे नाव जगाच्या नकाशावर नेले आहे. अभिमान वाटेल असे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. एक दिवसही सुट्टी घेतली नाही. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खा. डॉ. भामरेंना मतदान करा. भामरेंना मत म्हणजेच मोदींना मत. देश पातळीवर अनेक चांगल्या योजना पीएम मोदींनी आणल्या. राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांनी चांगले निर्णय घेतले आहेत. हे सर्व घेतलेले निर्णय आणि भामरेंनी केलेली कामे घेवून आपल्याला जनतेच्या दरबारात जायचे आहे. महायुतीचे कार्यकर्ते 24 तास जनतेच्या सेवेत आहेत. महाराष्ट्रात 45 पार आपल्याला करायचे आहे असेही ना. भुसे म्हणाले.
रॅलीत डॉ. राहुल सुभाष भामरे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, संजय वाल्हे, लोजपाचे दिलीप साळवे, शोभा चव्हाण, शशिकांत वाघ, राष्ट्रवादीचे कैलास चौधरी, सत्यजीत सिसोदे, सुमित पवार, गणेश जाधव, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, भारती माळी, वंदना थोरात, वंदना भामारे, वैशाली शिरसाठ, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, आकाश परदेशी, पंकज धात्रक, सुहास अंपळकर, राकेश कुलेवार, सुनिल बैसाणे, बंटी मासुळे, प्रकाश पोळ, पवन जाजू, मोहिनी धात्रक, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदिप कर्पे, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, देवेंद्र सोनार, शितल नवले, भिकन वराडे, ओम खंडेलवाल, हिरामण गवळी ,भगवान गवळी, अमित पवार, सचिन रनमळे, धिरज परदेशी, प्रविण अग्रवाल, विरेंद्र शर्मा, रोहित चांदोडे, जयेश मगर, बाबा माळी, मोहन टकले, उमेश ढापसे, जितू चौवटीया, बबन चौधरी, अजीतसिंग राजपुत, रावसाहेब कदम, शरद चौधरी, सुधाकर बेंद्रे, प्राची कुलकर्णी, सतीश अंपळकर, निलेश नेमाणे, प्रशांत बागुल, छोटू थोरात आदी पदाधिकारी, कार्यकर्ते भव्य मिरवणुकीत सहभागी झाले होते.
हेही वाचा