स्मारक समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात केले आंदाेलन
धुळे : उत्तर प्रदेशातील मैंनपुरी येथे शिराेमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाची यांच्या स्मारकाची विटंबना करण्यात आली. या घटनेतील दाेषींना त्वरीत अटक करावी अशी मागणी राजपूत समाजातफे करण्यात आली. या घटनेेच्या विराेधात विरशिराेमणी महाराणा प्रतापसिंहगी स्मारक समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आंदाेलन करण्यात आले. याबाबतचे निवेदनही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
याबाबत विर शिराेमणी महाराणा प्रतापसिंगजी स्मारक समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राजूपत समाजाचे श्रध्दास्थान असलेले दैवत हिंदू कुलसूर्य वीर शिराेमणी महाराणा प्रतापसिंह यंच्या स्मारकांची मैनपुरी उत्तर प्रदेश येथे काही असामाजिक तत्वानकडून विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. यातून सामाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. या घटनेचा राजपूत समाज निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी दाेषी असलेल्याचा तात्काळ शाेध घेवून त्यांना अटक करून कठाेर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. याविराेधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी अजितसिंह राजपूत, रत्नदीप सिसाेदिया, रामचंद्र काेर, महेंद्रसिंग सिसाेदिया, रावसाहेब गिरासे, दिलीप गिरासे, निलेश राजपूत, डाॅ. दरबारसिंग गिरासे, सुभाष राजपूत, प्रा. विजयसिंह सिसाेदिया, पुष्करसिंग राठाेड, कामेश सिसाेदिया, नानाभाऊ महाले, सचिन राजपूत, प्रा. अनिल गिरासे, बबलू परदेशी, आकाश राजपूत, अभिजित परदेशी, अजय राजपूत यांच्यासह इतर समाजबांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.