मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी डॉ. भामरे यांना निवडून द्या! आमदार जयकुमार रावल यांचे मतदारांना आवाहन
धुळे : चिन भारतापेक्षा तिप्पट मोठा आहे, प्रचंड सैन्य आहे पैसा आहे. हे चिनी लोक हिमालयातून उतरुन खाली येत आहेत आणि भारताकडे वाकड्या नजरेने पाहत आहेत. मात्र मोदी आहेत म्हणून त्यांची हिम्मत होत नाही. ते भारताचे काही वाईट करु शकत नाहीत. आपले स्वातंत्र्य कायम राहण्यासाठी आणि हा देश सुरक्षीत राहण्यासाठी तो मजबूत हातातच हवा. असा हिमालयासारखा मजबूत नेता कोणी असेल तर तो फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी हेच आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी येत्या २० तारखेला डॉ. सुभाष भामरे यांना तिसर्यांदा प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन भाजपा नेते माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी केले आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंगेस, आरपीआय, मनसे महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मालपुर ता. शिंदखेडा ८ मे रोजी सायंकाळी जाहिर सभा झाली. त्यावेळी आमदार रावल हे बोलत होते. याप्रसंगी भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ जाहिर सभा झाली. शिंदखेडा मतदारसंघाचे बुलंद नेतृत्व विकास पुरुष माजी मंत्री तथा आमदार जयकुमारभाऊ रावल हे अध्यक्षस्थानी होते. महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे, जि.प. सभापती महावीर सिंग रावल, नारायण भाऊसाहेब पाटील, कामराज निकम, तालुकाध्यक्ष दिपकदादा बागल, बाबाराजे सुर्यर्धनसिंग वाघेला, रणजित भाऊसाहेब, भुपादादा, जि प सदस्य धनंजय मंगळे, रघुवीर बागल, मा. जि प सदस्य विरेंद्र गिरासे, जि प सदस्य प्रभाकर पाटील, मालपूरचे मा. सरपंच श्रावण पांडू माळी, मच्छिंद्र शिंदे, व्ही.एल. पवार, हर्षवर्धन बागल, सागर बागुल, जिजाबराव गोरख पाटील, डी. एस. गिरासे, रामनाथ मालचे, सुरज देसले, प्रदीप गोपिंचंद मोरे, प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते.
सभेला संबोधित करतांना आ.रावल पुढे म्हणाले, की तिसर्या वेळेस मोदी साहेबांना आणि तिसर्यांदा डॉ. सुभाष भामरे यांना निवडून देण्यासाठी आणण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हायचे आहे. ही निवडणुक पुढच्या काळात भारताची दशा आणि दिशा कशी असणार, आपल्या मुलाबाळांचे, नातू पणतूंचे भविष्य काय असणार याचा विचार करण्याची ही वेळ आणि निवडणुक आहे. १ हजार वर्ष भारत देश गुलामगिरीतून बाहरे पडून आज कुठेतरी आपल्या विकासाला सुरुवात करतो आहे. त्याचवेळी ते चिन, पाकिस्तानी शत्रू आपल्या देशाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. चिनने तर नेपाळच्या राष्ट्रपतीला विकत घेतला, पंतप्रधानला बटीक बनवला, बाग्लादेशला बळकवता आहेत. श्रीलंकेला कंगाल करुन टाकला. पाकिस्तानला तर गहाण ठेवून घेतला आहे. मालदिव सारख्या छोट्या देशाला सुध्दा चिनने हस्तक बनवला आहे आणि चारही बाजूने भारतला घेरण्याचा प्रयत्न चिन करतो आहे. हे चिन भारतापेक्षा तिप्पट मोठे आहे, प्रचंड सैन्य आहे पैसा आहे, हे चिनी लोक हिमालयातून उतरुन खाली येत आहेत आणि भारताकडे वाकड्या नजरेने पाहत आहेत. मात्र मोदी आहेत म्हणून त्यांची हिम्मत होत नाही ते भारताचे काही वाईट करु शकत नाहीत. त्यामुळे ही निवडणुक गावची नाही, ग्रामपंचातीची नाही तर देशाच्या महापंचायतीची निवडणुक आहे. याचा विचार सर्वांनी करायला हवी. ही निवडणुक देव, देश आणि धर्मासाठीची निवडणुक आहे. साडेपाचशे वर्षानंतर अयोध्देत आपले प्रभु श्रीराम यांचे भव्य मंदिर उभे राहिले. अयोध्दा तर झाकी है, काशी मथूरा अभी बाकी है.. १८५६ मध्ये इंग्रजांविरुध्द लढा सुरु झाला आणि १९४७ मध्ये हा देश स्वतंत्र झाला ९० वर्ष लागले आणि आता आपले स्वातंत्र कायम राहण्यासाठी हा देश सुरक्षीत राहण्यासाठी तो मजबूत हातातच हवा, असा मजबूत हिमालयासारखा नेता कोणी आज असेल तर तो फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी हेच आहेत. दुसरा कोणीच त्यांच्यासमोर नाही. विरोधकांकडे कोणताही नेता नाही त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी येत्या २० तारखेला डॉ. सुभाष बाबा भामरे यांना तिसर्यांदा प्रचंड बहुमताने विजयी करुन अबकी बार चारसो पार करायचे आहे. असेही आमदार जयकुमार रावल यांनी जनसमुदायाला आवाहन केले.
अठरा पगड जातींच्या लोकांना विकासाची समान संधी दिली : महावीर सिंग रावल
जिल्हा परिषदेचे सभापती महावीरसिंग रावल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता बनवले. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली आणि जयकुमारभाऊ रावल हे मंत्री झालेत त्यांनी असंख्य विकास कामे मंजूर करुन आणली. माळी समाजासाठी ८० लाख रुपये आणले मात्र दुर्दैवाने २०१९ मध्ये आपली भाजपची सरकार बनले नाही आणि ते पैसे परत गेले आपल्या भागाचे मोठे नुकसान तेव्हा झाले. पंरतू पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आले आणि माळी समाजाच्या सभागृहासाठी जयकुमारभाऊ रावल यांनी ५० लाख रुपये मंजूर करुन आणले आहेत. आता आचार संहिता संपल्यानंतर त्या कामाची वर्क ऑर्डर होवून काम सुरु होईल. जि प निवडणुकीत आपण मला संधी दिली, प्रत्येक जाती समाजाच्या विकासासाठी आपण निधी दिला, सर्व अठरा पगड जातींच्या लोकांसाठी विकासाची समान संधी भाजप सरकारने उपलब्ध करुन दिली आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी देखील सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मालपूर आणि परिसरामध्ये जी विकास कामे होत आहेत सर्व गुण्यागोविंदाने येथे राहतात, सर्वांवर आपण समान प्रेम केले. त्यामुळे येत्या २० तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून डॉ. सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन जि.प. सभापती महावीरसिंग रावल यांनी केले.
सर्वांना मतदानासाठी प्रवृत्त करा : नारायणभाऊसाहेब पाटील
नारायण भाऊसाहेब पाटील म्हणाले की, धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव शहर, धुळे शहर ही मोठी शहरे आहेत, येथे अल्पसंख्याक समाजाची मते मोठ्या संख्येने असून एमआयएमचे आमदार निवडून आले आहेत. गेल्या दोन निवडणुका पाहिल्या तर मालेगाव शहरातून कॉंगे्रस उमेदवाराला दिड लाखाचा लिड मिळाला. डॉ. भामरे यांना ५ हजार मते मिळाली होती. मालेगावचा १ लाख ७५ हजाराचा लिड तोडण्यासाठी आपल्याला शिंदखेडा असेल मालेगाव ग्रामीण असेल बागलाण सटाणा आणि धुळे तालुका असेल येथून मोठ्या प्रमाणात आपल्याला मतदान करुन घ्यावे लागले, त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, ही देशाच्या आणि आपल्या भावी पिढीसाठीची लढाई आहे त्यामुळे कोणीही उन आहे म्हणून घरात बसू नये, सर्वांना मतदान करण्यास प्रवृत्त करावे. अशी हाक भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नारायणभाऊसाहेब पाटील यांनी दिली.
दहशतवाद्यांना घरात घूसून मारणारा कणखर नेता मोदीच : खा. डॉ. भामरेया सभेत महायुतीचे उमेदवार खा.डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, २० मे रोजी होणार्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा आणि मित्रपक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्या समोर मतांचा जोगवा मागण्यासाठी उभा आहे. हि निवडणुक गटार,मिटरची नाही तर देशाची निवडणुक आहे. आपल्याला विचार करायचा आहे. की, एकीकडे फक्त आपल्या परिवाराचा विचार करणारा एका कुटूंबात सत्ता भोगणार्यांचा पक्ष आहे तर दुसरीकडे देशातील १४० कोटी जनतेला आपला परिवार मानणारा आणि देशासाठी जीवन वाहून घेणारा आणि संपूर्ण जगात मान सन्मान मिळवणारे नेतृत्व असलेल्या मोदी साहेबांचा पक्ष आहे. यात योग्य कोण याची निवड तुम्हाला करायची आहे. मुंबईत झालेले बॉम्ब स्फोट आपण पाहिले आहेत, देशभरात दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट होत होते हे आपण पाहिले आहे मात्र २०१४ साली मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून कुठल्याही शहरात बॉम्ब स्फोट झाला नाही. पाकिस्तानातील बिळांमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांना सुध्दा ठार केले जात आहे ही मोदी स्टाईल आहे. हा नेहरुंच्या नेतृत्वातला भारत नाही तर मोदींच्या नेतृत्वात असलेला नवा भारत आहे. पुलवामा हल्ला झाला १८ जवान शहिद झाले तेव्हा सुध्दा मोदी साहेबांनी थेट पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन त्याचा बदला घतला. कोणी आगळीक केली तर घरात घूसून मारण्याची ताकद ठेवतो. अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त केले शेकडो दहशतवादी ठार केले. आणि त्या सर्जिकल स्ट्राईकचा मी सुध्दा एक हिस्सा होतो, तुमच्या आशिर्वादाने देशाचा संरक्षण राज्यमंत्री म्हणून मी सुध्दा त्या मोहिमेचा भाग बनलो होतो याचा अभिमान मला आहे. असा कणखर पंतप्रधान मोदी साहेबांच्या रुपात देशात आहे त्यामुळेच आपला देश सुरक्षीत आणि विकसीत होत आहे. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी आपल्याला यावेळी देखील भाजपला विजयी करावे लागेल. म्हणून येत्या २० तारखेला सर्वांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सेवेची संधी मला द्या, आपले आशिर्वाद द्या, मोदी साहेबांना विजयी करा, असे आवाहन खा.डॉ. सुभाष भामरे यांनी केले.