प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेमुळे खान्देशात काँग्रेसची लाट
धुळे : धुळे : काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेमुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसची लाट आली आहे. प्रियंका गांधी यांची शनिवारी नंदुरबारमध्ये जाहीर सभा झाली. त्या नंदुरबारमध्ये येण्याआधीच नंदुरबार जिल्ह्यातील जनतेने लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती. प्रियंका गांधी यांचे आगमन होताच लाखोंच्या जनसमुदायामध्ये उत्साह संचारला आणि जोरदार घोषणाबाजी झाली. मोदींच्या सभेपेक्षा जास्त गर्दी प्रियंका गांधी यांच्या सभेला होती. त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये घबराट पसरली आहे. प्रियंका गांधी यांच्या नंदुरबारमधील जाहीर सभेचा परिणाम संपूर्ण खानदेशात होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सेवा आणि समर्पण भावनेतून जनतेसाठी काम करणार्या इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी धुळे लोकसभेत इंडिया आघाडीच्या उमेवारांना विजयी करण्याचे आवाहन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियका गांधी यांनी केले. नंदुरबार येथील प्रचार सभा आटोपून आल्यानंतर त्यांनी गोंदूर विमानतळ येथून परतत असताना आवाहन केले. दरम्यान प्रियंका गांधी यांचे स्वागत आमदार कुणाल पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ.अश्विनीताई कुणाल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे शनिवारी सकाळी 10.30 वाजता गोंदूर विमानतळावर आगमन झाले. त्यांचे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ.अश्विनीताई कुणाल पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी प्रियंका गांधी यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीचा अहवाल जाणून घेतला. नंदुरबार लोकसभेतील इंडिया आघाडीचे उमेदवार अॅड.गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ 11 मे रोजी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेचे नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेनिमित्ताने त्यांचे खाजगी विमानाने धुळे येथील गोंदूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील तसेच सौ.अश्विनीताई कुणाल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रियंका गांधी यांनी धुळे लोकसभेतील उमेदवाराची निवडणूकीबाबत माहिती जाणून घेतली.
दरम्यान, नंदुरबार येथील सभा आटोपून आल्यावर त्यांनी धुळे लोकसभेतील मतदारांना आवाहन करतांना सांगितले कि, जनतेच्या हितासाठी काम करणार्या इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले पाहिजे. इंडिया आघाडीतील नेते, पदाधिकारी निवडणूकीतील उमेदवार सेवा आणि समर्पण भावनेने काम करीत आहेत. त्यामुळे धुळे लोकसभेत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना बहूमताने विजयी करावे, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले.
यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष डॉ.अनिल भामरे, महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस युवराज करनकाळ, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, उमेदवार प्रतिनिधी डॉ. मयुरी बच्छाव, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव राहूल माणिक, बापू खैरनार, विजय चिंचोले, डॉ. ममताताई पाटील, डॉ. शैलेंद्र पाटील, बानुबाई शिरसाठ, भावना गिरासे, दीपक अहिरे, भैय्या चौधरी, राजेंद्र देवरे, प्रकाश पाटील, प्रमोद सिसोदे, अलोक रघुवंशी, नरेंद्र पाटील, प्रशांत पदमोर, छाया पवार, तुषार गर्दे आदी उपस्थित होते.
प्रियंका गांधी यांचे नंदुरबार येथील भाषण
नंदुरबार : राहुल गांधी एक असा नेता आहे ज्याने कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत चार हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला. मणिपूरमध्ये झालेल्या घटनेच्या बाबतीत नरेंद्र मोदीसह त्यांचे एकही मंत्री संसदेत बोलू शकले नाहीत. मणिपूरातील घटना रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शहा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कुठलेही पाऊल उचलले नाहीत म्हणून मोठी घटना घडली. एकमेव आदिवासी मंत्री हेमंत सरेन यांना देखील मोदी सरकारने जेलमध्ये टाकले आहे. हा एक प्रकारे आदिवासींवर अन्यायच आहे.
आदिवासींसाठी जीवन समर्पित करणाऱ्या देशाच्या राष्ट्रपती द्रोपती मुरमुन त्यांच्या हस्ते नवीन संसदेचे उद्घाटन न केल्याने त्यांचा अपमानच आहे. एकीकडे प्रधानमंत्री म्हणतात आदिवासींच्या सन्मान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तर दुसरीकडे आदिवासींचा अपमान अशा प्रकारे केला जात आहे. जो खरंच सन्मान करतो तो राजकीय फायद्यासाठी सन्मान करत नाही, नरेंद्र मोदी फक्त राजकीय फायद्यासाठी सन्मान करत आहे.
महाराष्ट्रात सुमारे दोन लाख आदिवासींना वनपट्टे दिले गेले नाहीत. हा काय आदिवासींच्या सन्मान आहे? कालच्या नरेंद्र मोदींच्या सभेचे उदाहरण देत ते म्हणाले, मी शबरीचा पुजारी आहे, मग मणिपुरातील शबरीचा आपमान झाला तेव्हा मोदीजी चूप का होते? कुठे भगवान रामाची शबरी आणि कुठे नरेंद्र मोदींची खोकली बाते.
ऑलम्पिकमधील खेळाडूंचा मोदीजींनी सन्मान केला परंतु ज्या वेळेस ते रस्त्यावर बसले त्यावेळेस नरेंद्र मोदीजी घरातून बाहेर निघाले नाहीत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या उमेदवारांना भाजपाकडून उमेदवार दिली गेली तेव्हा नरेंद्र मोदी का गुपचूप बसले?
नरेंद्र मोदी म्हणतात, मी एकटा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. मग पूर्ण सत्ता तुमची आहे तरी तुम्ही एकटे कसे, सवाल प्रियंका गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.
इंदिराजींकडून काहीतरी शिका. त्या दुर्गारूपी महिलेकडून काहीतरी शिका. तिने पाकिस्तानचे दोन तुकडे केले. किती महान लोकांनी प्रधानमंत्रीपद सांभाळले त्या लोकांनी लोकतंत्र समजले त्याचे आदर केले आणि आज आपण त्या पदाचा आदर तुम्ही खाली आणला.
महागाईमुळे आजच्या महिलेला घर चालविताना मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण देखील अपूर्ण ठेवण्याची पाळी आजच्या महिलांवर येत आहे. मुलीच्या लग्नासाठी कर्ज घ्यावं लागत आहे. ही गोष्ट नरेंद्र मोदी समजू शकतात, असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदी कोणाचा घरात किंवा सर्वसामान्यांमध्ये जात नाही. इंदिरा गांधींचा फोटो काढा. ते तुमच्या घरात येऊन गेले आहेत. हाच विकास आहे का. मी नरेंद्र मोदींना खुले आवाहन करते की, त्यांनी एका आदिवासीच्या घरात जाऊन फोटो काढून दाखवावा.
गेल्या निवडणुकीत त्यांनी आश्वासन दिले होते, देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख येतील. दोन करोड लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, कुठे गेले मोदींचे आश्वासन? नरेंद्र मोदींनी काय केले महाराष्ट्रात, आमदारांना फोडून सत्ता स्थापन केली तर हा काय मतदारांचा सन्मान आहे का?
काँग्रेसने काहीच केले नाही, असे म्हणणारे आज देश विकत आहेत. हे काँग्रेसच्या कार्यकाळातीलच आहे. करोडपतींचेच कर्ज फक्त माफ होत आहेत आणि शेतकऱ्यांचा अपमान करीत आहेत. काँग्रेसने प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फक्त आश्वासन देत आहेत.