सनातन धर्माला विरोध करणाऱ्या हिंदू विरोधी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार का, अमित शहा यांचा मतदारांना प्रश्न
धुळे : वोट बँक टिकविण्यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पाठ फिरविणाऱ्या आणि सनातन धर्माला विरोध करणाऱ्या हिंदूविरोधी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना साथ देणार का, असा प्रश्न देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी सोमवारी धुळ्यात केला. धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारताला जगातली तिसर्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवून देशाला एक सक्षम, बळकट विकसीत राष्ट्र करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे. मोदी सरकारने धुळे जिल्ह्यात ३ लाख घरात नळाव्दारे पाणी पोहचवले, सुलवाडे जामफळ योजनेसह अनेक सिंचन योजनांसाठी २५०० कोटी रुपयांचा निधी दिला. सहा राष्ट्रीय महामार्ग बनवले, नवीन हायवे, रेल्वे मार्ग तयार करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडवीस यांच्या सरकारांनी केले आहे. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी ४ हजार करोडची भावातंर योजना आणली आहे, निवडणुका संपल्या की कापूस उत्पादन शेतकर्यांच्या खात्यात थेट हे ४ हजार कोटी रुपये टाकले जाणार आहेत. धुळेकरांनो मोदींची गॅरंटी लक्षात ठेवा, आणि येत्या २० मे रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपचे उमेदवार डॉ.सुभाष बाबा भामरे यांना विजयी करा, असे आवाहन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी धुळेकरांना आज केले.
धुळे शहरातील गोसेवा आश्रम मैदानावर 13 मे रोजी दुपारी धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमदेवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे जेष्ठ नेते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जाहिर सभा झाली. यावेळी व्यासपिठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे, भाजपाचे राज्यसभेचे खासदार अजित घोपचडे, धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आदी उपस्थित होते.
धुळे शहराचे ग्राम दैवत एकविरा माता, महाकाली माता, रोकडोबा हनुमान मंदिर, सिध्देश्वर गणपती मंदिर, गुरुनानक गुरुद्वारा यांना प्रणाम करीत गृहमंत्री अमित शहा यांनी केली भाषणाची सुरुवात. सभेत गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर तसेच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कॉंगे्रस नेते राहुल गांधी यांच्यावर प्रामुख्याने टिका केली. ते म्हणाले, उध्दव ठाकरे यांच्यात खरच नैतीकता शिल्लक असेल त्यांनी सांगावो खरच कलम ३७० हटवले पाहिजे की नाही. कॉंगे्रसच्या अंजेड्यावर काश्मिरमध्ये पुन्हा कलम ३७० लागे करणे, देशात मुस्लिम परस्नल लॉ लागू करण्यासारखे विषय आहेत आणि उध्दव ठाकरे त्या कॉंगे्रस सोबत जावून मते मागतात. आता तर त्यांनी स्वातंत्रविर सावरकर यांचे नाव देखील घेण्याचे बंद केले आहे.
कॉंगे्रस नेते राहुल गांधी हे या देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम नाहीत, ज्या राहुल गांधीचे राजकीय लॉचिंग २०-२० वेळा फेल झाले आहे ते राहुल गांधी चंद्रयानचे लॉचिंग करु शकतात काय, देशाला सुरक्षीत ठेवू शकतात का? असा सवाल उपस्थित केला.
धुळे लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी दिला गेला. असेही गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. ते म्हणाले, मोदी सरकारने १८०० कोटीची भारतमाला योजना धुळ्यात आणली, धुळे दादर स्वतंत्र रेल्वे सुरु केली. प्रधानमंत्री आवास योजनेतून २५ हजार घरांची निर्मिती केली. सहा नविन राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले. सुलवाडे जामफळ सिंचन योजनेसह विविध सिंचन योजना मंजूर करीत या भागातील शेतकर्यांच्या शाश्वत विकासासाठी मोठे विकासाचे योगदान मोदी सरकारच्या माध्यमातून दिले. पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार आल्यावर आम्ही या देशाला जगातली तिसर्या क्रमांकाची अर्थ व्यवस्था तयार करु. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला प्रचंड प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
कॉंगे्रसवाले वोट जिहाद करतील, तर आपण मतदानाचा यज्ञ करु : देवेंद्र फडणवीस : जन्मानत जी योजना झाली नसती, अशा सुलवाडे जामफळ सिंचन योजनेसाठी २ हजार ७०० कोटी रुपये मोदींजीची दिले. त्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मोठा पाठपूरावा केला. धुळे जिल्हयसाठी आणि लोकसभा मतदारसंघासाठी सिंचनाचे अपुर्ण प्रकल्प पुर्ण करण्याचे काम आपल्या भाजप सरकारने केले, सिंचनाचे हे प्रकल्प पुर्ण करुन पश्चिमकडील पाणी उत्तरेकडे आणले जाईल, धुळ्यात सहा राष्ट्रीय महामार्ग झाल्याने धुळ्याला वेगळे महत्व आले आहे. असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंगे्रसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, कॉंगे्रसचे लोक म्हणत आहेत आम्ही वोट जिहाद करणार आहोत, त्यांना सांगा आम्ही सुध्दा मतांचा यज्ञ करणार आहोत, एक एक मतांची आहुती देऊ आणि मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करु. देशाला सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदीजी हेच देवू शकतात त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी डॉ. सुभाष भामरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लिड कोणाचा जास्त?आ.रावलांचे आव्हान स्विकारले : दादा भुसे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाची कामे कोपर्यामध्ये सुरू आहे. याला जबरदस्त साथ केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिळत आहे आणि म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना तो पण विषय आपल्याला जनतेपर्यंत द्यायचा आहे. खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी देखील १० वर्ष रस्ते, महामार्ग, सिंचन प्रकल्प, रेल्वे मार्गाची मंजूरी अशी विकास कामा संपन्न केलेली आहेत. ती विकास कामे आपल्याला जनतेच्या घराघरापर्यंत पोहोचवायचे आहे. आपण सर्व कार्यकर्ते जनतेच्या सुखदुःखामध्ये जे आपण सहभागी असतो आपल्याला जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी कमळ दिला मतदान मागायचा आहे. आताच आमदार जयकुमार रावल यांनी डॉ. सुभाष भामरे यांना कोणता तालुका सर्वात जास्त लिड देतो, असे आवाहन केले. त्यांचे आव्हान आम्ही मालेगाव तालुक्यातील जनता स्विकारतो आणि डॉ. सुभाष भामरे यांना मालेगाव तालुक्यातून तसेच मालेगाव बागलाण भागातून डॉ. सुभाष भामरे यांना मोठा लिड मिळवून देवू असे देखील मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
भारताचे शत्रू राष्ट्र सुध्दा मोदींना घाबरतात : जयकुमार रावल : खा.डॉ.सुभाष भामरे यांना गेल्यावेळपेक्षा अधिक मतांनी निवडून देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे असे आवाहन भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार यांनी केले. २०१९ मध्ये डॉ.भामरे यांना दोन लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी करण्यात आले. यावेळीही यापेक्षा अधिक मतांनी त्यांना निवडून द्यायचे आहे. यावेळी आ.रावल यांनी भारताच्या शत्रू राष्ट्रावर जोरदार हल्ला चढवीला. ते म्हणाले, चीन सातत्याने आपल्या देशावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. पण आज चिनी लोक आपल्या मोदी साहेबांना घाबरतात. त्याची हिम्मत होत नाही, चीनने पाकिस्तानला कंगाल करून टाकलं मालदीवचे राष्ट्रपतीला सुद्धा खिशात घालून घेतले आणि चारी बाजूंनी आपल्या देशाला घेण्याचा प्रयत्न ते करतात. म्हणूनच आपल्याला समजून घ्यावे लागेल. मागच्या कॉंग्रेसच्या काळामध्ये चीनी सैन्य हिमालयाच्या पलीकडे येऊन गेले. सातत्याने ते वाकडा डोळयाने भारताकडे बघतात. चीन सारख्या शत्रू राष्ट्राला जर नियंत्रणात ठेवायचे असेल भारताचे रक्षण करायचे असेल तर या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी करुन तिसर्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान करायचे आहे आणि त्यासाठीच धुळे लोकसभा मतदारसंघातून खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयाची हॅट्रीक साधायची आहे. त्यासाठी शिंदखेडा, धुळे, मालेगाव असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी केले.
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा तुमचे आशिर्वाद द्या : डॉ. सुभाष भामरे : उमेदवार डॉ. सुभाष भामरे म्हणाले, की गेल्या १० वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न, प्रकल्प सोडविण्यास प्राधान्य दिले. यामध्ये सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण केली. योजनेचे ८० टक्के काम पूर्णत्वास आले असून, या योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील १०० व धुळे तालुक्यातील १०० गावांचा सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. येत्या दीड वर्षात ही गावे सुजलाम-सुफलाम होतील. याचबरोबर धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाचे काम आचारसंहितेनंतर सुरू होत आहे. मतदारसंघात ७ राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात यश आले. तसेच आगामी काळात धुळे मतदारसंघात या पायाभूत सुविधांमुळे औद्योगीकरणाला वेग येणार असून, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉच्या दुसर्या टप्प्यात धुळे जिल्ह्याचा समावेश झाल्याने अन्नप्रक्रिया, इथेनॉल तसेच टेक्स्टाइल पार्कही सुरू होत आहेत. यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्नही निकाली निघणार असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा संधी देत पुन्हा एकदा तुमचे आशिर्वाद द्या, असे आवाहनही डॉ. भामरे यांनी केले.
सभेला मान्यवरांची उपस्थित : सभेला भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे, आमदार अमरिशभाई पटेल, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, धुळे लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे लोकसभा समन्वयक नारायण पाटील, धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, भाजपचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख राम भदाणे, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, शिवसेनेचे धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले, धुळे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, धुळे महानगरप्रमुख संजय वाल्हे, संजय गुजराथी, समाधान शेलार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, प्रांतिक सदस्य किरण शिंदे, किरण पाटील, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित शिसोदे, धुळे जिल्हाध्यक्ष सुमित पवार, मनसेचे धुळे जिल्हाप्रमुख ड. दुष्यंतराजे देशमुख, धुळे महानगरप्रमुख संजय सोनवणे, डॉ. मनीष जाखेटे, उत्तर महाराष्ट्र सचिव प्राची कुलकर्णी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रदेश उपाध्यक्ष वाल्मीक दामोदर, प्रदेश सचिव ड. महेंद्र निळे, उत्तर महाराष्ट्र कोशाध्यक्ष एस. आर. बागूल, जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, राजूबाबा शिरसाट, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नयना दामोदर, शहराध्यक्षा सरला निकम, लोकजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप साळवे, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा शोभाताई चव्हाण, जिल्हा महासचिव कुंदन खरात, मधुकर चव्हाण, धुळ्याचे माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या डॉ. माधुरी बोरसे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, धुळे महानगर जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हा, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य यांच्यासह महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरपालिकांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बाजार समित्या आदी सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.