चारशे पारचा नारा देणारे मोदी मंगळसूत्रावर घसरले : अरुण यादव
धुळे : चारशे पारचा नारा देणारे निवडणूकीत पराभव होत असल्याचे पाहुन मंगळसुत्रावर घसरले. परंतु ते स्वतःच्या पत्नीच्या मंगळसुत्राचे रंक्षण करु शकले नाही. ते काय देशातील माता भगिनींचे रक्षण करणार अशी टिका काँग्रेसचे स्टार प्रचारक, माजी मंत्री तथा मध्यप्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरुण यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
धुळे ग्रामिणचे आमदार कुणाल पाटील यांच्या सुंदर सावीत्री सभागृह या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत यादव बोलत होते. या पत्रकार परिषदेला ग्राणिमचे आ. कुणाल पाटील, शामकांत सनेर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल भामरे, दरबारसिंग गिरासे आदी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत माजी खा.यादव म्हणाले की, भाजपचं सरकार जाणार हे निश्चित झाल्याने पंतप्रधानांची भाषा बदलली आहे. कंबरेखालची भाषा त्यांनी सुरु केली आहे. ४०० पार वरुन हिंदु मुस्लीम आणि त्यानंतर मंगळसुत्रचा विषय ते निवडणुकीच्या आखाड्यात आाणत आहे. भाजपचे तुष्टीकरणाचे राजकारण करीत आहे. धुळे आणि मध्यप्रदेशसाठी लाईफलाईन ठरणार्या मनमाड-इंदुर रेल्वेमार्गाचे काय झाले. भारतीय जनता पक्षाच्या धुळ्याच्या खासदारांनी नेमके काय काम केले. अक्कलपाडा धरण आम्ही बांधले हे सर्वांना माहित आहे. परंतु त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले. त्यांच्याकडे दाखवायला काम नाही त्यामुळेच ते कोणतेही विषय निवडणुकीत घालत आहेत. इंडिया आघाडीची सत्ता येणारच हे आजपर्यंत झालेल्या चार टप्प्यातील निवडणुकींच्या फिडबॅकवरुन आम्हाला कळत आहे.त्यामुळे केंद्रात एक मजबुत सरकार बनवणं, आमचा जाहीरनामा हा सर्व घटकांसाठी आहे. काँग्रेसची गॅरेंटी सर्व समाजासाठी आहे. जगातील सर्वात मोठी पदयात्रा राहुल गांधी यांनी केली. भाईचारा एकता आणि प्रेमासाठी ही यात्रा गांधींनी काढली होती. दरवर्षी दोन कोटी रोजगार भाजप सरकार देणार होते. परंतु रोजगारनिर्मितीसाठी त्यांनी एकही योजना आणली नाही.
परंतु केंद्रात आमचे सरकार आल्यानंतर २५ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या तरुणांना १ वर्ष भत्ता देण्यात येईल. त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. नंतर नोकरी देण्यात येईल. सरकारी नोकर्यांमध्ये ३० लाख पदे भरली जाती. तरुणांसाठी स्टार्टअप असेल.जात निहाय जणगणना केली जाईल. मनमोहनसिंग यांचे सरकार असताना शेतकर्यांना भुसंपादनााचा चार पट मोबदला मिळायचा. परंतु मोदी सरकारच्या काळात ते बंद झाले. शेतकर्यांसाठी आम्ही एमएसपीची गॅरेंटी देत आहोत. मनरेगाची रोजंदारी २०० वरुन ४०० करणार, महिलांसाठी लक्ष्मी योाजनेच्या माध्यमातून दरवर्षी त्यांच्या खात्यात एक लाख रुपये टाकणार. सरकारी नोकर्यांमध्ये महिलांना ५० टक्केआरक्षण देणार. २५ लाखापर्यंत आरोग्य विम्याचे कवच जनतेसाठी असणार.मनरेगाची योजना शहरी भागातही राबवणार. शेतकर्यांना कर्जमाफीही देणार. संविधान बदलायचे असल्याने भाजपने ४०० पारचा नारा दिला होता.हिटलर शाही देशात लागू करण्याचा त्यांचा इरादा आहे.
हेही वाचा
शोभाताई बच्छाव भाजपमध्ये जाणार नाहीत? कुणालबाबांची गॅरंटी