८० टक्के गरीब जनता माझ्या बाजुने : राज चव्हाण यांचा विजयाचा दावा
धुळे : धुळे लोकसभा मतदार संघातील ८० टक्के गरीब जनता माझ्या बाजुने आहे. त्यामुळे या निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आज सकाळी ११ वाजता अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत भैय्यासाहेब पारेराव आणि सहकारी उपस्थित होते.उमेदवारीबाबत भुमीका मांडताना राज चव्हाण म्हणाले की, धुळे लोकसभा मतदाार संघाचा काँग्रेस अथवा भाजपाकडून विकास झालेला नाही. सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले दोन पक्षांचे उमेदवार स्वतःला तुल्यबळ समजतात.
परंतु धुळ्याला खासदार आजपर्यंत मिळालाच नाही. खासदार मिळाला असता तर विकासाचा अनुषेश राहिलाच नसता.सत्तेवर जाण्यासाठी मी निवडणुक लढवत नसल्याचे ते म्हणाले. खा.डॉ.सुभाष भामरे हे दहा वर्षांपासून लोकप्रतिनिधीत्व करीत असले तरी पक्षशिस्तीच्या नावाने त्यांना मतदार संघातील प्रश्न मांडता आले नाही. संसदेची निर्मिती भारतीय संविधानाने झालेली असल्याने सभागृहात देशात सर्वात आधी विकासापासून वंचीत आणि मागासलेल्या मतदार संघात जनतेची गरीबी दुर करण्यासाठी आणि गोरगरीबांचा प्रश्न व समस्यांची जाण असलेल्या प्रतिनिधींची गरज लक्षात घेवून मी डॉ.आंबेडकरांच्या विचारांवर प्रामाणिकपणे काम करीत असल्याने माझी उमेदवारी दाखल केली आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात पाण्याचा प्रश्न भीषण आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माझे प्रयत्न राहतील शिंदखेडा,सटाणा येथे पाण्याचाी व्यवस्था झाली तर एमआयडीसी देखील उभ्या राहतील. संदेशभुमी येथे झालेल्या बैठकीला मी उपस्थित होतो. काल ज्या बुध्दीजीवींनी काँग्रेसला पाठींबा देत असल्याचे जाहीर केले. ते माझ्यासोबतच आहे. माझ्यामुळे मतविभाजन होणार नाही. ८० टक्के गरीब जनता माझ्या सोबत आहे. ते मतदान करतात त्यामुळे माझा विजय निश्चत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.