मनमाड-इंदूर रेल्वेमार्गही पुर्ण होणार : नितीन गडकरी
धुळे : सुलवाडे-जामफळ-कनोली सिंचन योजनेचे सर्व श्रेय डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे जाते, कारण यासाठी त्यांनी आपल्याकडे किमान २५ वेळा चकरा मारल्या. याशिवाय महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणार्या रस्त्यांचे कामही ७० टक्के पुर्ण झाले आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांच्या निर्यातीच्या प्रश्नावरही आचार संहिता संपताच तोडगा काढण्यात येईल. असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे आज दुपारी मंत्री नितीन गडकरी यंाची सभा झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री तथा आ. जयकुमार रावल, खा. डॉ. अनिल गोपचिडे, आ. काशिराम पावरा, राजेंद्र फडके, जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, आ.मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी आदी मान्यवर उपस्थि होते.
यावेळी बोलतांना मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, की धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील जल सिंचन ५० टक्केपेक्षा अधिक होईल, अशी महत्वाकांशी योजना आपण आणणार असून या योजनेतर्ंगत विविध तलाव आणि नद्यांच्या खोलीकरणासोबतच अन्य कामांचा समावेश असेल. धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चाची कामे होणार असून २०१४ पुर्वी किती कामे झाली होती, हे आपणा सर्वांना ठावून आहे. गेल्या ६० वर्षात म्हणजे कॉंगे्रसच्या कारकिर्दीत झाली नाहीत ऐवढी कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात पुर्णत्वास आली आहेेत. यात रस्ते, सिंचन या योजनांसह मुलभुत सोयी सुविधांच्या कामांचा समावेश आहे. आपण जळगाव ते धुळे असा हेलिकॉप्टर मधून प्रवास करीत असतांना धुळे जिल्ह्यातील तापी नदी पाहिली, यावेळी तापी नदीचे पाणी परिसरातील शेती क्षेत्रात पुर्ण क्षमतेने पोहचलेले दिसले नाही. यामुळे उर्वरित कामे पुर्ण करावी लागणार आहेत.
आपण केंद्रात सिंचन मंत्री असतांना राज्यात ५० टक्के कामे पुर्ण होवून रखडलेल्या प्रकल्पांसाठी १८ हजार कोटी रुपये मंजूर केले आणि या कामांच्या पुर्ततेसाठी विविध योजनांना गती दिली. याचवेळी डॉ. सुभाष भामरे यांनी प्रलंबित असलेल्या सुलवाडे-जामफळ-कनोली योजनेच्या कामाला मंजूरी द्यावी म्हणून आपल्याकडे येवून सविस्तर निवेदन केले. आपण पंतप्रधान आणि त्याच्या सचिवांची भेट घ्यावी असे डॉ. भामरे यांना सुचवले. यानंतर त्यांनी पंतपधानांचे सचिव नृपेंद्र मिश्रा यांची भेट घेतली त्यांच्याकडून पत्र मिळवले आणि हे पत्र आपल्याला मिळाल्यानंतर तातडीने आपण सुलवाडे-जामफळ या महत्वकांक्षी योजनेला मंजूरी दिली. आज योजनेचेचे काम ७० टक्के पूर्ण झाले हे पाहून समाधान वाटते. याचे श्रेय कोणाला असेल तर ते फक्त खा.डॉ.सुभाष भामरे यांनाच असल्याचे देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
बहुचर्चित मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा उल्लेख करीत मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम लवकर पुर्ण होईल, असे सांगितले. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग मंजूर करण्यासाठी देखील खा.डॉ. सुभाष भामरे यांनी प्रचंड पाठपूरावा केला, त्यांच्या प्रयत्नामुळे या मार्गाला मंजूरी मिळाली आणि आज पहिला टप्पा म्हणून धुळे ते नरडाणा रेल्वेमार्गाचे काम सुरु झाले आहे. असेही गडकरी यांनी सांगितले.
या सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबोधीत केले. ते म्हणाले, मोदींच्या सरकारमध्ये खा.डॉ. सुभाष भामरे यांनी काम केले. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये पाणीदार खासदार म्हणून काम केले. तर जयकुमार रावल यांनी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दमदार असे काम केले. कर्तबगार आमदारांचे तेव्हा सर्वेक्षण झाले त्यात जयकुमार रावल यांचा टॉप टेन आमदारांमध्ये आले होते. आपले पुढेचे भविष्य जयकुमार रावल आहेत असा गौरवोद्गार काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मोफत धान्य दिले, आरोग्य कार्ड दिले, विविध योजनांची माहिती दिली. कॉंगे्रसवरही जोरदार टिका केली.