डॉ. सुभाष भामरेंना प्रचंड मतांनी संसदेत पाठवा : योगी आदित्यनाथ
मालेगांव : भारतात राहून, भारताचे खाऊन काही जण पाकिस्तानचे गोडवे गातात, आज पाकिस्तानची हालत काय झाली आहे, तेथे गहू आणि आटा मिळत नाही. लोक पिठासाठी रस्त्यावर आले आहेत. तेथे दंगे होत आहेत आणि येथे मोदींनी ४ वर्ष देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले. पुढील ५ वर्ष मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जे पाकिस्तानचे गोडवे गातात त्यांना पाकिस्तानात पाठवा, म्हणजे त्यांची अक्कल ठिकाणावर येईल, असा हल्लाबोल प्रखर हिंदूत्ववादी नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.
देशभरात आज एकच स्वर गाजतो आहे, देशात आज एकच नारा घुमतो आहे.. फिर एक बार, मोदी सरकार.. फिर एक बार मोदी सरकार.. आणि सर्वांचा संकल्प आहे अबकी बार चारसो पार.. नवा भारत निर्माण करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी धुळे, मालेगावच्या जनतेने निर्धार करा उच्च शिक्षीत कॅन्सर तज्ञ संसद रत्न खासदार डॉ. सुभाष भमरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करुन पुन्हा संसदेत पाठवा असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेला केले.
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचाराची सांगता आज मालेगाव येथे फायर ब्रॅण्ड नेता योगी आदित्य नाथ यांच्या तुफान सभेने झाली. मालेगावच्या कॉलेज ग्राऊंडवर झालेल्या या सभेला धुळे, मालेगाव, सटाणा बागलाण परिसरातून लाखोंच्या संख्येने महिला, तरुण, पुरुष, अबाल वृध्द आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंचावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे पक्ष निरीक्षक तथा खासदार डॉ. अजित गोपचिडे, खासदार अनिल बोंडे, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, श्री इंद्रदेव महाराज, धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश निकम, राजेंद्र फडके, धुळे लोकसभा समन्वयक नारायण पाटील, भाजपचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. निलेश कचवे, धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, डॉ. तुषार शेवाळे, सौ. सुरेखा भुसे, अजय भोळे, शैलेंद्र आजगे, निलेश माळी, सुनील गायकवाड, लकी आबा गिल, मनीषाताई पवार, डॉ. शेषराव पाटील, संजय भामरे, नितीन सोनवणे, राहुल सोनवणे, श्रीधर कोठावदे, साहेबराव सोनवणे, संजय दुसाने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, विजय देवरे, देवा पाटील, कमलेश निकम, समाधान हिरे, धनंजय पवार, किशोर इंगळे, सतीश पवार, मुकेश झुणझुणवाला, हरिप्रसाद गुप्ता, नंदू सोयगावकर, भरत पोफळे, राहुल पाटील, जयवंत पवार, राकेश भामरे, भारत जगताप, भारत चव्हाण, सुनील मोरे, दादा जाधव, संदीप पाटील यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी उपस्थित होते.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, आमचा संकल्प होता, रामलल्ला को लायेगे, मंदिर वही बनायेंगे .. कॉंगे्रसचा कंलक हटवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या करोडो हिंदूची आस्था असलेल्या प्रभु श्रीरामांचे भव्य मंदिर अयोध्देत उभारले. आणि आज कॉंगे्रसचे नेते म्हणतात की त्यांची सत्ता आली तर आम्ही राम मंदिर पाडून टाकू, अरे राम मंदिर पाडणे तर दूर तुम्हाला युपीची जनता अयोध्देत घूसू सुध्दा देणार नाही. प्रभु श्रीराम तुम्हाला या लायक सुध्दा ठेवणार नाही की तुमची सत्ता या देशावर येईल. कारण देशातील १४० करोड जनतेचा निर्धार आहे जो राम को लाये है.. हम उनको लायेगें… देशात पुन्हा कॉंगे्रसची सत्ता येईल हे कदापी येणार नाही. देशात मतदानाचे चार टप्पे पुर्ण झाले आहे आणि आता पाचवा टप्पा होत असून देशात एकच नारा घुमतो आहे, एकच स्वर गाजतो आहे तो म्हणजे फिर एक बार मोदी सरकार… फिर एक बार मोदी सरकार.. अबकी बार चारसौ पार… महाराष्ट्रातही या पाचव्या टप्प्यातील १३ जागांवर एनडीए आणि भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करुन आपण संसदेत पाठवावे धुळे आणि मालेगावच्या जनतेने देखील निर्धार करावा, संसदरत्न खासदार डॉ. सुभाष भामरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करुन संसदेत पाठवावे. असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.
कॉंगे्रसच्या जाहिरनाम्यावर हल्लाबोल : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभेत कॉंगे्रसच्या जाहिरनाम्यावर हल्लाबोल चढवला. ते म्हणाले, आजची कॉंगे्रस ही महात्मा गांधीची कॉंगे्रस नाही, ही सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक यांची कॉंगे्रस नाही तर ही सोनिया कॉंगे्रस आहे, राहुल कॉंगे्रस आहे. कॉंगे्रसच्या जाहिरनाम्यात मुस्लिम लिगची छाप आहे. कॉंगे्रसने जो जाहिरनामा प्रसिध्द केला आहे त्यात हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील एससी एसटी वर्गाचे आरक्षण धर्माच्या आधारावर मुस्लिमामध्ये लागू करण्याचे आश्वासन कॉंगे्रसने दिले आहे. हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण हे कॉंगे्रसवाले देवू इंच्छितात यापुर्वी देखील सत्ता असतांना कॉंगे्रसने जस्टीस रंगनाथन कमेटी बवनली होती आणि दलित, आदिवासी मागास समाजासाठी असलेले आरक्षणातील ६ टक्के आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला होता आम्ही संसदेत खासदार होतो भाजपने त्यावेळी प्रखर विरोध केला संसदेचे काम रोखले आणि कॉंगे्रसला धर्माच्या आधारावर आरक्षणात वाटे करण्यास विरोध केला. पुन्हा कॉंगे्रसने जस्टिस राजेंद्र सच्चर यांची कमेटी बनवली या सच्चर कमेटीने अल्पसंख्याक मुस्लिमांना दलित, आदिवासींच्या आरक्षणातील वाटा देण्याची शिफारस केली, ती सच्चर कमेटीची शिफारस लागू करु असे देखील कॉंगे्रसच्या जाहिरनाम्यात म्हटले आहे. असा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.
शहजांदे म्हणत राहुल गांधींवर टिका : कॉंगे्रसचे नेते राहुल गांधी यांच्यावर योगी आदित्यनाथ यांनी शहजांदे म्हणत जोरदार टिका केली. कॉंगे्रसचे शहजांदे म्हणात आम्ही सत्तेत आलो तर एक झटके मे गरीबी हटा देेंगे, कशी हटवणार गरीबी तर म्हणतात, वेल्थ इंमरजन्सी आणून विरासत टॅक्स लावणार. म्हणजे तुमच्याकडे असलेली अर्धी संपत्ती सरकार जमा करुन ती अल्पसंख्याक मुस्लिमांना वाटणार. कॉंगे्रसच्या शहजांदेचा हा विचार म्हणजे औरंगजेबने ज्या प्रकारे जिजीया कर लावला होता त्या प्रकारचा कर आहे, महाराष्ट्रातील जनता याचा स्विकार करणार काय? असा सवाल देखील उपस्थितांना योगी आदित्यनाथ यांनी केला.
डॉ. सुभाष भामरे उच्चशिक्षीत : सभेत योगी आदित्यनाथ यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, डॉ. सुभाष भामरे हे आमचे संसदेतील मित्र आहेत. ते उच्च शिक्षीत आहेत कॅन्सर तज्ञ आहेत. त्यांना विकासाची जाण आहे. देशात आज पायाभुत क्षेत्रात मोठे काम होत आहे. महामार्ग, चार पदरी सहा पदरी हायवे तयार होत आहे. वर्डक्लास प्रकल्प साकारले जात आहेत. हा विकासाचा वाटा धुळे लोकसभा मतदारसंघात आणण्याची क्षमता डॉ. सुभाष भामरे यांच्यात आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन देखील योगी आदित्यनाथ यांनी केले.
अयोध्देला या… योगींनी दिले निमंत्रण : जाहिर सभेत बोलतांना योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित सर्व नेते आणि जनसमुदायाला अयोध्देत येण्याचे आणि प्रभु श्रीराम यांच्या मंदिरात दर्शन घेण्याचे आवाहन करीत आमंत्रण दिले. ते म्हणाले, अयोध्दा आता पुर्णपणे बदलून गेली आहे. प्रभु श्रीरामाच्या काळात होती तशी अयोध्दाला आता सुंदर आणि विकसीत हेात आहे. आम्ही अयोध्देत सर्व सुविधा देत आहोत, तुम्ही सुध्दा या श्रीराम लल्लांचे दर्शन घ्या. खासदार डॉ, सुभाष भामरे आणि सर्व आमदारांनी यावे मला आधी सुचना द्या मी सर्व सोय करतो. असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.