गजेंद्र अंपळकर यांची हकालपट्टी का केली नाही?
धुळे : येथील हर हर महादेव व्यायाम शाळेत घडलेल्या अल्पवयीन कुस्तीपटू मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात डॉ. सुभाष भामरे यांनी पोलीस अधीक्षक आणि पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना फोन केले असतील. त्यामुळे डॉ. भामरे यांचे काॅल रेकॉर्ड तपासले पाहिजे. पोलिसांनाही या गुन्ह्यात सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी रविवारी लोकसंग्राम कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. तसेच भाजपचे महानगरप्रमुख गजेंद्र अंपळकर यांची अजुनपर्यंत पक्षातून हकालपट्टी का केली नाही?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. खासदारांना धुळे शहराच्या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी एखादा बोअरवेल करावासा वाटला नाही. त्यापेक्षा ज्या ठिकाणी महिलांचं शोषण होतं, त्या व्यायाम शाळेला निधी दिला. म्हणजे भ्रष्टाचार करणारे चांगले पैलवान तयार झाले पाहिजेत, म्हणून निधी दिला आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. भाजपला महिलांचं चारित्र्य महत्वाचं वाटतं नाही. त्यांना रेवण्णा सर्वश्रेष्ठ वाटतो. उलट त्याला वरच्या पदावर पाठविण्याची भाषा पंतप्रधान करतात. ब्रिजभुषणसिंग यांच्याविरुद्ध अजुनही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे भाजप हा ढोंगी, लबाड आणि लुटारूंचा पक्ष आहे, अशी टिका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली.
हेही वाचा
अल्पवयीन कुस्तीपटू मुलीच्या अत्याचार प्रकरणामुळे धुळ्यात भाजप अडचणीत
माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्धीला दिलेले पत्रक
धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी रविवारी सकाळी कल्याण भवनातील लोकसंग्राम पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी प्रसिद्धीला दिलेले पत्रकात म्हटले आहे की, दिवसातून किमान शंभर वेळा तरी, बेटी बचाव बेटी पढावचा जप करणाऱ्या भाजपाचे खरे विदारक स्वरूप आता हळू-हळू जनतेसमोर येत आहे. कुस्तीतील आपल्या दैदिप्यमान खेळाने भारत मातेच्या गळ्यात असंख्य सुवर्णपदकांची मालीकाच अर्पण करणाऱ्या महिला कुस्तीपटूंवर अखिल भारतीय
कुस्ती संघटनेच्या अध्यक्षानींच बलात्कार केल्याचे कुप्रसिध्द प्रकरणाने जगभर भारताची प्रतिमा डागाळणाऱ्या या नव्या संस्कृतीच्या वारसांची धुळ्यातही पैदावार झाली असल्याचे नुकतेच प्रकाशात आले आहे.
भाजपाचे सभ्य, सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित, मीतभाषी दोन वेळा खासदार पद उपभोगणारे डॉ. सुभाष भामरे यांचे पट्टशिष्य तसेच भारतीय जनता पक्षाचे धुळे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचेवर कलम ३५४, ३२३, ५०४, ५०६ (२), १४३, ९४७, १४८, ९४९ प्रमाणे (पोस्को कायदा) बालकाचे लैंगिक शोषण कायदा २०१२ चे कलम (२) अन्वये तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश धुळ्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश वाय. जी.
देशमुख साहेबांनी सी. आर. पी. सी. कलम १५६ (३) अन्वये तातडीने गुन्हा दाखल करण्याचे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक याना दिले आहेत. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी अन्य योग्य पोलीस अधिकाऱ्याची
नेमणुक करून माननीय न्यायालयास लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.
दिनांक १५ मे २०२४ रोजी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत अनिल गोटेंनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा पक्षात समाजातील बलात्कारी, भ्रष्टाचारी तसेच संबंधीत भागातील नामचीन गुंड व सराईत गुन्हेगारांना निवडून-निवडून सत्तारूढ भारतीय जनता पक्षात दिल्लीपासून गल्लीपर्यंत पक्षात प्रवेशित करण्याचा
कार्यकम युध्द पातळीवर हाती घेण्यात आला आहे. भाजपा शासीत राज्यांमध्ये अशा “समाज पुरूषांनाः’ एक ठोस होलसेलमध्ये प्रवेश देण्याची जणू स्पर्धा
लागली आहे. उत्तरप्रदेशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात भरधाव वेगाने गाडी चालवून शेतकरी आंदोलकांवर घालून सहा शेतकरी बांधवांना एकाच वेळी
ठार मारले. अंजू मिश्रा हे केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचे दिवटे पुत्र व राजकीय वारस आहेत. त्यांच्या विजयासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करताना म्हटले आहे की, मिश्रा यांना प्रचंड बहुमताने निंवडून द्या ! त्यांना अजून उच्च पदावर पाठवायचे आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री यांचे किर्तीमान पुत्र तसेच माजी पंतप्रधान एच.
डी. देवगोडा यांचे नातू खासदार प्रणव रेवांण्णा यांनी आत्तापर्यंत ४०० वर बलात्कार केले असल्याचे तीन हजार व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरत आहेत. अशा बलात्काऱ्यास जर्मनीत पळून जाण्यास केंद्र सरकारने मदत केली असल्याचे दिसून येते. त्यांची भाजपमधून अजूनही हकालपट्टी केली नाही. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सुर्णपदकांची लयलुट केली अशा महिला कुस्तीपटूंवर बलात्कार करणाऱ्या खासदाराला अटक होवू दिली नाही. आता त्यांच्या मुलाला भाजपने तिकीट दिले असून, आजूबाजूच्या भाजपाच्या आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर
सोपविण्यात आली आहे.
धुळे महापालिका निवडणुकीच्या काळात राजवर्धन कदमबांडे यांच्या बत्तीस गुंड टोळी सदस्यांना एक ठोस प्रवेश देवून महापालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्याच त्यांच्या हाती सोपवल्या. आपण सर्वानीच मिळून धुळे शहराचे नेमके किती वाटोळे केले स्वत: पाहिले आहे. यातून काही गुंड भाजपात प्रवेश करू शकले नाहीत. आजमितीस एकही गुंड पक्षाच्या बाहेर राहता कामा नये याची दखल घेत सर्वाना भाजपा प्रवेश करून घेण्याचा सपाटा चालविला आहे. धुळे शहरातील सराईत व नामचीन गुंडांना
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश देवून गुंडांच्या सहभागाचे वर्तुळ पूर्ण केले आहे. माझे सर्व माता-भगिनींना जाहीर आवाहन आहे की, अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली खरोखरच तुमच्या मुली-बाळींच्या,
सुनांच्या, माता-भगिनींच्या अब्रू सुरक्षित राहणार आहे का? याचा जरूर विचार करावा, असे आवाहन अनिल गोटेंनी केले आहे.
प्रवेश देवून गुंडांच्या सहभागाचे वर्तुळ पुर्ण केळे आहे. मागील पाच वर्षात धुळे शहरात प्रचंड गुंडगिरी वाढली असून, गुंडांना कायद्याची अजिबात भिती राहिलेली नाही. अत्यंत किरकोळ कारणांवरून जीवघेण्या मारामाऱ्या तर सहज होतात. संशयीत आरोपींना फरार होण्यासाठी पोलीसच मदत करतात. खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी सहा-सहा महिने फरार राहतात. हे पोलीसांच्या सहभागाशिवाय शक्यच होवू शकत नाही. धुळे शहरात
विमल गुटखा, गांजा, हातभट्टी, अमली पदार्थाची तस्करी, नकली धंद्याची राजधानी झाली आहे. सामान्य जनता त्रस्त झाली असून, पोलीसांच्या एकतर्फी कारवाईमुळे उत्तरप्रदेश, बिहारप्रमाणे पोलीस स्टेशनवर हल्ले करू लागले आहेत.