• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Monsoon Update मान्सून केरळमध्ये दाखल !

no1maharashtra by no1maharashtra
30/05/2024
in धुळे, राज्य, राष्ट्रीय
0
0
SHARES
119
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

15 जून पर्यंत खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात मौसमी पाऊस

धुळे : मान्सूनविषयी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मौसमी वारे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाले आहेत. 30 मे रोजी मान्सून केरळ आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये दाखल झाला असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलयं. मान्सूननं केरळचा जवळपास संपूर्ण भाग आणि ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये पदार्पण केलयं. मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश ही सर्व राज्ये मान्सूननं व्यापलीहेत. तर मेघालय आणि आसाम तसंच लक्षद्वीपमध्ये सुद्धा मान्सूननं पदार्पण केलय. येत्या 15 जूनपर्यंत मौसमी पाऊस खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असं हवामान विभागानं म्हटलयं.
फक्त पाऊस आला म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली असं नसतं. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ट कालावधीत पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सूनची सुरुवात झाल्याचं जाहीर करतात.
केरळमध्ये गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालायं. पुढच्या दोन-तीन दिवसात मान्सून दक्षिण भारत, तामिळनाडू, बंगालचा उपसागर, पश्चिम बंगाल, आणि सिक्कीममध्ये दाखल होईल. तसच आसाम आणि अरुणाचलचा उर्वरित भागही व्यापेल असं हवामान खात्याने म्हटलयं.
महाराष्ट्रात मान्सून केव्हा? : केरळमध्ये एरव्ही एक जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. यंदा तो दोन दिवस लवकर इथे दाखल झालाय. साधारणपणे मान्सून पाच जूनच्या आसपास गोव्यात, 10 जूनच्या आसपास मुंबईत आणि 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अवतरतो. त्यामुळे जूनच्या मध्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सूननं व्यापला जाईल, अशी अपेक्षा आहे. सध्या केरळ आणि वायव्यमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलायं. तर सिक्कीम आणि अरुणाचलमध्येही ऑरेंज अलर्ट, आसाम आणि मेघालयमध्ये रेड अलर्ट देण्यात आलायं.
उष्णतेची लाट : दुसरीकडे देशात उष्णतेची लाटही कायम आहे. बिहारमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट तर वायव्येकडील राज्ये, मध्य भारत, पूर्व भारतात आणि ओडिसामध्ये उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय. पण 31 मे आणि एक जूनपासून पुढच्या काही दिवसांमध्ये या उष्णतेपासून उत्तर भारताला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रात उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती उत्तर महाराष्ट्रातही राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलायं.
No.1 Maharashtra

मान्सून म्हणजे काय ? : मान्सून या शब्दाची उत्पत्ती अरबी शब्द ‘मौसिन’ या शब्दापासून झालेली आहे. ‘मौसिन’ याचा अर्थ मौसम असा होतो. अरबमध्ये समुद्रात नावा घेऊन उतरलेल्या नावाड्यांनी मॉवसिम ( मान्सून ) हा शब्द शोधून काढला आहे. यानंतर मानसूनी वाऱ्यांना मान्सून म्हणायला सुरुवात झाली. मान्सून वारे उन्हाळ्यातील मे ते ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंतच्या कालावधी नैऋत्ये दिशेकडून वाहतात. आणि इतर वेळी ईशान्येकडून वाहतात. याला ‘मौसमी वारे’ असेही म्हणतात. परंतु, आशियाई किनारी प्रदेशांमध्ये ‘मान्सून’ या शब्दाचा अर्थ ‘पावसाळा’ या अर्थी वापरला जातो. बंगालच्या उपसागरातून आणि नैऋत्येकडील अरबी समुद्रातून वाहणाऱ्या मोठ्या मोसमी वाऱ्यांचा संदर्भ देण्यासाठी ब्रिटीश भारत आणि शेजारील देशांमध्ये हा शब्द पाऊस या अर्थीच वापरत. जगातील प्रमुख मान्सून प्रणालींमध्ये पश्चिम आफ्रिकन, आशिया-ऑस्ट्रेलियन, उत्तर अमेरिकन आणि दक्षिण अमेरिकन मान्सून यांचा समावेश होतो.

नैऋत्य मोसमी वारे ( South West Monsoon ) : उन्हाळ्यात वाढत्या तापमानाने हवा तापू लागते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ते सर्वाधिक होते. तापमानाची ही स्थिती भारताच्या वायव्य आणि उत्तर भागात जुलै महिन्यापर्यंत राहते. त्यावेळी दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. त्यामुळे तेथे हवेचा जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. भारताच्या वायव्य भागातील कमी दाबाच्या पट्ट्याने आग्नेय व्यापारी वारे विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धात येतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे आपल्या उजवीकडे वळतात आणि त्यामुळे ते नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. त्यांनाच ‘नैऋत्य मान्सून’ वारे म्हणतात आणि मान्सूनच्या आगमनाला सुरुवात होते. ‘नैऋत्य मान्सून’ वारे हिंदी महासागरावरून वाहत असल्यामुळे ते आपल्याबरोबर जास्त बाष्प वाहून आणतात.

‘नैऋत्य मान्सून’ वारे दोन्ही दिशेने : ‘नैऋत्य मान्सून’ वारे भारतात दोन मार्गानी प्रवेश करतात. अरबी समुद्रावरून येणारे मान्सून वारे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून येतात आणि उत्तरेकडे आणि पूर्वेकडे वाहत जातात. बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्यांच्या पूर्व-पश्चिम विस्तारामुळे पश्चिम बंगालवरून पंजाबकडे जाते. दुसरी शाखा पतकोईच्या दक्षिणोत्तर विस्तारामुळे मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेशाकडे वाहते. भारतातील एकूण पर्जन्यांपैकी 80 टक्क्यांपेक्षाही अधिक पर्जन्य नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून मिळतो.

ईशान्य मोसमी वारे (North East Monsoon) : उत्तर भारतामध्ये डिसेंबर महिन्यात तापमान झपाट्याने खाली येते. त्यामुळे तेथे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. परंतु यावेळी हिंदी महासागरावर तापमान वाढल्याने हवेचा कमी दाबाचा प्रदेश तयार होतो. त्यामुळे उत्तर भारताकडून हिंदी महासागराकडे कोरडे वारे वाहू लागतात तेव्हा काही प्रमाणात तेथे पाऊस पडतो. चेन्नईला ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून अधिक पाऊस पडतो. या हिवाळ्यातला पाऊस असेही म्हटले जाते.

मान्सून अंदमानात आधी दाखल होतो. तो अंदमानात आला की आपल्याला हायसं वाटतं. बस्स आता आणखी वाट पाहावी लागणार नाही. मजल दर मजल करीत पाऊस केरळात दाखल होतो. त्यानंतर मुंबईत तो जूनच्या साधारण पहिल्या आठवड्यात आपली वर्दी देतो. या पाऊसाची आपण माहीती घेणार आहोत. आपण शाळेत भुगोल शिकताना नैर्ऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे शिकलेलो आहोत.

मोसमी पाऊस ही पृथ्वीवर घडणारी चमत्कारिक गोष्ट आहे. आपण शाळेत भुगोलातील पुस्तकात शिकलोय की पृथ्वी स्वत: भोवती फिरता… फिरता सुर्याभोवती देखील फिरत असते. पृथ्वी अक्षापासून थोडीसी कललेली असते. त्यामुळे पृथ्वी थोडीशी तिरकी फिरल्याने पृथ्वीवर ऋृतूचक्र तयार होते. आपल्या पृथ्वीचा उत्तरेकडेचा भाग जेव्हा सुर्याकडे असतो, तेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. तर दक्षिण गोलाधार्त थंडी पडलेली असते. त्यामुळे उत्तर गोलार्धात कमी दाबाचा आणि दक्षिण गोलाधार्त जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. त्यामुळे वारे दक्षिण गोलार्धाकडून उत्तर गोलार्धाकडे वाहतात. ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात आहे, त्यामुळे हिंद महासागरातून वारे वाहत अरबी समुद्रावरुन भारतात येतात. अरबी समुद्रापेक्षा जेव्हा राजस्थान परिसरातील वारे अधिक तापलेले आढळतात. तेव्हा तेथेही कमी दाबाचा पट्टा तयार होत असतो. एवढा सगळा प्रवास करताना हे वारे सोबत गरम बाष्प घेऊन आलेले असतात. हे बाष्प घेऊन आलेले ढग आकाशात उंच ठिकाणी जातात. तेव्हा तेथे थंड हवा लागल्याने ढगातील बाष्प पावसाच्या रुपाने जमीनीवर कोसळते. त्यालाच पाऊस म्हणतात.

‘एल- निनो’ आणि ‘ला -निना’ : भारतातील पावसावर समुद्रातून आलेल्या वाऱ्यांचा प्रभाव पडतो. एक म्हणजे एल- निनो स्थिती. या स्थितीत दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीतील पॅसिफीक महासागराचे पाणी तापते आणि तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे आपल्याकडे येणारे काही मोसमी वारे दक्षिण अमेरिकेच्या दिशेने सरकतात, त्यावेळी अशा स्थितीत आपला मान्सून कमजोर पडतो. मग आपल्याकडे दुष्काळ पडू लागतो. ही स्थिती कधी तयार होईल याचे काही वेळापत्रक नाही. याच्या उलट परिस्थिती ‘ला -निना’ स्थितीत होते. या स्थितीत अरब आणि हिंद महासागरातील पाणी थंड होते. आणि तेथे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आता वारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारतातील कमी दाबाच्या पट्ट्यात वाहायला सुरुवात होते. येथून बाष्प घेऊन वाहणारे शक्तीशाली वारे भारतात प्रचंड पाऊस पाडतात. आणि भारतात पूरसृदृश्य स्थिती निर्माण होते.

मान्सूनचे वय किती ? : काही अभ्यासांच्या मते मान्सूनची ही परिस्थिती लाखो वर्षांपासून आहे. अरबी समुद्र आणि तिबेटचे पठार यांच्या आधारे मान्सूनचे वय 80 लाख वर्षे असल्याचे म्हटले जाते. जगभरात अनेक ठिकाणी मान्सून आहेत. केनिया, सोमालिया, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलियाची दक्षिण किनारपट्टी, कॉंगो, इंडोनेशिया, मलेशिया, युगांडा. जुन महिन्याच्या सुरुवातीला आपल्या येथे पावसाचे आगमन होते. मान्सून दाखल झाल्याचे ओळखण्याचे हवामान खात्याचे स्वत:चे गणित आहे. पाऊस किमान दोन दिवस सतत सुरु राहीला आणि सर्वदूर पर्जन्यमापक यंत्राद्वारे त्याची मोजणी केली जाते. ती 2.5 मिमी झाली पाहीजे. तेव्हाच हवामान खाते मान्सून आल्याचे जाहीर करते. भारतातील मान्सून हा सर्वात मोठा असतो. भारतातील मान्सूनचा सोहळा तब्बल चार महिने असतो. असा मान्सून सोहळा जगात अन्यत्र कुठेही होत नाही.

भारतात मान्सूनचे वारे : भारतात उन्हाळ्यात नैऋत्य मोसमी वारे वाहतात आणि हिवाळ्यात ईशान्य मोसमी वारे वाहतात. मान्सून उन्हाळ्यात समुद्राकडून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीपासून समुद्राकडे प्रवास करतात, त्यामुळे यास मोसमी वाऱ्यांची दुहेरी प्रणाली म्हणतात. नैऋत्य मान्सून तिबेटच्या पठारावर तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे उद्भवतो. तर ईशान्य मान्सून सायबेरियन आणि तिबेट पठारांवर तयार झालेल्या उच्च दाबाच्या परिस्थितीमुळे तयार होते. हिंद महासागर आणि अरबी समुद्रावर सहा महिने ( ईशान्य ) उत्तर-पूर्वेकडून आणि उर्वरित सहा महिने नैऋत्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे रुपांतर मोसमी पावसात होतात.

जगातला सर्वाधिक पाऊस आसामच्या चेरापुंजी येथे जगातला सर्वाधिक पाऊस पडतो असे म्हटले जाते. चेरापुंजीतील पावसाचे वैशिष्टये म्हणजे त्याचा सर्वाधिक मारा दिवसा सकाळच्या वेळी होतो. येथील मावसिनराम गावात देखील पाऊस जास्त होतो. 16 जून 1995 रोजी चेरापुंजी येथे एका दिवसात ( 24 तासांत ) एकूण 1563 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. मुंबईत 26 जुलै 2005 रोजी एका दिवसात 944 मिमी पाऊस पडला होता. कोकणातील आंबोली गावात आणि माथेरान येथे देखील जास्त पाऊस होतो.

अतिपर्जन्य विभाग : ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, हिमालयाचा दक्षिण उताराचा पूर्वेकडील भाग, सह्याद्रीचा घाटमाथा, पश्चिम किनारपट्टीचा भाग, तसेच केरळ या भागाला ( Very High Rainfall Region ) अति पावसाचे प्रदेश म्हटले जाते. येथे सरासरी पर्जन्यमान 200 सेंटीमीटर पेक्षा जादा पाऊस पडत असतो. आसाममधील चिरापुंजी भागाला

जास्त पर्जन्य विभाग : सामान्यतः 100 ते 200 सेंटीमीटर वार्षिक वार्षिक पर्जन्यमान असणारे विभाग मध्यम पर्जन्य विभाग म्हणून ओळखले जातात. यात द्वीपकल्पीय पठाराचे पूर्वेकडील उतार, उत्तर भारतातील मैदानी प्रदेशाचा पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भाग, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र किनारपट्टी, पूर्व महाराष्ट्राचा भाग, ईशान्य भारताचा दक्षिण भाग या क्षेत्रांला जास्त पर्जन्य विभाग (High Rainfall Region) म्हटले जाते.

मध्यम पर्जन्य विभाग : 50 से.मी. ते 100 से.मी. च्या दरम्यान होणाऱ्या पर्जन्य वितरण क्षेत्रास ( Medium Rainfall Region ) मध्यम पर्जन्य विभाग म्हणून ओळखला जातो. दख्खन पठारावरील पर्जन्य पठारावरील पर्जन्य छायेचे प्रदेश, पश्चिम आणि उत्तर गुजरात, राजस्थानचा पूर्व आणि मध्य भाग यांचा यात समावेश होतो. हा बहुतेक भाग दुष्काळी स्वरूपाचा आहे.

कमी पर्जन्य विभाग : येथे वार्षिक सरासरी 50 सेमी. पेक्षा जास्त वार्षिक पर्जन्य मान होते. म्हणून त्याला कमी पर्जन्यमानाचा ( Low Rainfall Region ) प्रदेश म्हटले जाते. पश्चिम राजस्थान, पंजाबचा पश्चिम भाग, जम्मू-काश्मीरचा ईशान्य भाग यांचा समावेश होतो. निमशुष्क हवामानाचे म्हणून ओळखले जातात.

– प्रा. ॲड. तुकाराम मासुळे, धुळे

No.1 Maharashtra

Tags: Monsoon information in marathiMonsoon NewsMonsoon UpdateWhat is Monsoon?मान्सून म्हणजे काय ?
ADVERTISEMENT
Previous Post

Vidhanparishad Election ॲड. महेंद्र भावसार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी?

Next Post

Vidhanparishad Election शिक्षक आमदार निवडणुकीचे अभ्यासू उमेदवार ॲड. महेंद्र भावसारांच्या नगरमध्ये राजकीय पदाधिकारी व शिक्षक भेटी

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Vidhanparishad Election शिक्षक आमदार निवडणुकीचे अभ्यासू उमेदवार ॲड. महेंद्र भावसारांच्या नगरमध्ये राजकीय पदाधिकारी व शिक्षक भेटी

Vidhanparishad Election शिक्षक आमदार निवडणुकीचे अभ्यासू उमेदवार ॲड. महेंद्र भावसारांच्या नगरमध्ये राजकीय पदाधिकारी व शिक्षक भेटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
NO 1 Maharashtra

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us