शालेय जीवनात नाट्य विषय सक्तीचा होण्यासाठी प्रयत्न करणार : नीलम शिर्के-सामंत
धुळे : बालरंगभूमी म्हणजे केवळ बालनाट्य नव्हे. मुलांचे नृत्य, संगीत, संस्कार वर्ग, व्यक्तिमत्त्व विकास अशा सर्व गोष्टींचा बालरंगभूमीत समावेश होतो. कारण नाटक हा कलाप्रकाराच सर्व बाबींना सामावून घेणारा आहे. त्यामुळे आगामी काळात बालरंगभूमी सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करणार आहोत’’, असा बालरंगभूमी परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष नीलम शिर्के-सामंत यांनी व्यक्त केला. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.
नीलम शिर्के- सामंत यांनी सभासदांना तसेच इतर पदाधिकाऱ्यांना परिषदे मार्फत घेण्यात येणाऱ्या उपक्रम राबवण्या बाबतीत तसेच बालरंग भूमीचा बाल मनावर व लहान मुलांचे उज्वल भवितव्य घडवण्या करिता कश्या प्रकारे उपयुक्त होईल याचे मार्गदर्शन केले.लहान मुलांवर डिजिटल युगाचा झालेला प्रादुर्भावातून बाहेर काढण्या साठी रंगभूमी तसेच चित्रकला नृत्य गायन यासारख्या इतर कलांना जोपासण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गाव पातळीवर संघटनात्मक बांधणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषद ची धुळ्याची कार्यकारणी नीलम शिर्के-सामंत यांची नुकतीच जाहीर केली. त्यांनी बालरंगभूमी परिषदेच्या प्रस्तावित उपक्रमांबाबत माहिती दिली.
त्यांनी धुळे शाखांच्या अडचणी, त्यांचे उपक्रम याबाबत माहिती जाणून घेतली. त्यांना काय करता येईल याबाबत काही योजना सुचविल्या. परिषद सगळे काही करू शकत नाही, सर्व शाखांचे सक्रिय योगदान त्यात महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही शाखांना बळ देण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’ केवळ उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्याच नव्हे, तर वर्षभर विविध माध्यमांतून मुलांसाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही नीलम शिर्के-सामंत यांनी नमूद केले. बालनाट्य शिबिरांची संख्या, बालनाट्य स्पर्धांचे आयोजन, मुलांना सामाजिक जबाबदारीचे भान देणार उपक्रम अशा विविध माध्यमांतून बालरंगभूमी परिषद सक्रिय असेल, असे त्यांनी सांगितले. तसेच धुळ्यातील नाट्यगृह दुरावस्था विषयी आवाज उठवत निवेदन देखील देण्यात येतील असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. शहरासह तालुक्यातील गावात शाळांना भेट देऊन उपक्रमाविषयी माहिती दिले जाईल असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष नीलम शिर्के-सामंत नाट्य परिषद खजिनदार सतीश लोटके,नाट्य परिषद निमयाक मंडळ सदस्य मुंबई चंद्रशेखर पाटील, बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी दिपाली शेळके, गोजम मुंडे,अल्ताफ अन्सारी आदी उपस्थित होते.
नवी पिढी तयार करण्याचे उद्दिष्ट : बालनाट्य प्रत्येक बालकाच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग आहे. बालनाट्य करायला आणि पाहायला मिळणे, ही बालकांची गरज आणि हक्क आहे. बाल प्रेक्षक चळवळ उभारून बाल प्रेक्षकांची नवी, भावी पिढी तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. बालनाट्यासाठी अनुदान आणि प्रयोगांसाठी नाट्यगृहाची सुविधा व सवलत बालनाट्य संस्थांना मिळाव्या म्हणून आम्ही प्रयत्नशील असणार आहोत.
धुळे कार्यकारणी जाहीर : बालरंगभूमी परिषदेची धुळे शाखेचा पत्रकार भवन येथे उद्घाटन कार्यक्रम पार पडला. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखा अध्यक्षा नीलम शिर्के- सामंत आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सदर बालरंगभूमी परिषदेचे धुळे शाखेची कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी केदार नाईक, उपाध्यक्ष राजन पवार,कार्याध्यक्ष सिद्धांत मंगळे,कार्यवाह सुजय भालेराव,सह. कार्यवाह शशिकांत नागरे, कोषाध्यक्ष राहुल मंगळे,सदस्य :हर्षल परदेशी, ज्योती चौहान,अजय कासोदे, जगदीश चव्हाण, हर्षदा पाटील,तसेच सल्लागार – अलका बियाणी, सुनिल नेरकर, चंद्रशेखर पाटील यांचा समावेश आहे.