जनक्रांती प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
धुळे : शहरात रविवार दिनांक 9 जून रोजी भगा मोहन नगर येथील शिवसाई मंदिराच्या आवारात जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
गेल्या काही दिवसापासून शहराला उष्माघाताच्या संकटाला तोंड द्यावे लागते आहे. अशा परिस्थितीत जिल्हाभरात रक्ताचा मोठा तूटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांना रक्तासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या उपचारांमध्ये अडचणी येत आहेत. अशावेळी एक हात मदतीचा म्हणून जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी यांच्या वतीने शहरात रक्तदान करण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्यासाठी धुळे शहरातील भगा मोहन नगर येथील शिवसाई मंदिराच्या आवारात रविवार दिनांक 9 जून रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल 152 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे यात 22 महिलांनी देखिल रक्तदान केले. तसेच सर्व रक्तदात्यांना प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान केल्याची आठवण व त्यांची स्फूर्ती वाढावी म्हणून रक्तदात्यांना रक्तदानाचे प्रमाणपत्र आणि ब्लूटूथ हेडफोन सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर कर्पे, गुड्डू अहिरराव, छोटू थोरात, संजय पाटील, चेतन मंडोरे, देवा सोनार, दिनेश बागुल, बाळू शेनगे, निनाद पाटील, रजनीश निंबाळकर, बबन चौधरी, पंकज भारस्कर तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
तसेच या शिबिरासाठी जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी, जय किशन चौधरी, शुभम चौधरी, बंटी परदेशी, किशोर चौधरी, शशांक पाटील, मिलिंद कानळगे, बंटी गोरे, हरीश चौधरी, निनाद पाटील, करण कर्पे, मुकेश थोरात, सागर निकम, गोपाल पाटील यांच्यासह सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.