श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाला आय अँड रेटिना सेंटरचा शुभारंभ
धुळे : शहरातील नकाने रोडवरील श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये रविवार दिनांक 9 जून रोजी सिद्धी ज्योत आय अँड रेटिना सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. या advanced eye care unit च्या शुभारंभ निमित्ताने मोफत नेत्र व रेटीना तपासणी शिबिरही घेण्यात आलं. या शहराला उत्तम असा प्रतिसाद मिळाला.
सिद्धी ज्योत आय अँड रेटिना सेंटरमध्ये कॉप्रेंसिव्ह आय एक्झामिनेशन, डायबेटिक रेटिना इव्होल्युशन, रेंटियल सर्जरी, रेंटियल इंजेक्शनस् अँड लेझर्स इत्यादी दर्जेदार सर्विसेस मिळतील. या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना देखील लागू आहे. मोतीबिंदू वगळता इतर अनेक उपचार रुग्णांना मोफत मिळणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत यंत्र सामग्रीच्या मदतीने या ठिकाणी नेत्र तपासणी केली जाते. नॉर्मल रेटिना आणि डायबेटिक रेटिना तपासणीनंतर रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार केले जातात.
श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या सिद्धी ज्योत आय रेटिना सेंटरच्या सुविधांचा सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सर्जन डॉ. प्रियंका अग्रवाल, डॉ. दीप्ती काळे, डॉ. विकास राजपूत, डॉ.मनोज पटेल, डॉ. तुकाराम पाटील, डॉ. पूनित पाटील, डॉ. मुकेश सूर्यवंशी, डॉ. प्रफुल्ल जाधव, डॉ. यतीन वाघ, डॉ. किशोर सातपुते यांनी केले आहे.