धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच वकील संघाच्या उपाध्यक्षपदी ॲड. खैरनार, ॲड. पाटील यांची निवड
धुळे : जिल्हा ग्राहक तक्रारण निवारण मंचच्या वकील संघाच्या २०२४ ते २०२६ या दोन वर्षासाठीच्या कार्यकारणीची निवड प्रक्रीया नुकतीच पार पडली. यावेळी अध्यक्षपदी ॲड. वाल्मिक ए. कचवे-पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी ॲड. योगेश खैरनार,ॲड. मनोज एम. पाटील यांची निवड करण्यात आली.
ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या वकील संघाचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत येशीराव, उपाध्यक्ष ॲड. जितेंद्र निळे व उर्वरीत कार्यकारणीने राजीनामा दिला. यामुळे नविन कार्यकारणीच्या निवडीची बैैठक धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष ॲड. मधुकर भिसे, सचिव ॲड. सुधा जैन मंचावर उपस्थित होते. या बैठकीत ॲड. वाल्मिक एच. कचवे-पाटील यांची अध्यक्षपदी तर ॲड. योगेश खैरनार, ॲड. मनोज एम. पाटील यांची उपाध्यक्षपदी, सचिवपदी ॲड. पराग खानकरी, महिला सचिव ॲड. मंगला चौधरी तर कोषाध्यक्षपदी ॲड. अमोल भि. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारणी सदस्य म्हणुन ॲड. विलास एच. सोनवणे, ॲड. संजय जाधव, ॲड. सचिन पी. कुलकर्णी, ॲड. अनिकेत एस. शिंपी, ॲड. शशिकांत पाटील,ॲड. राहुल आय. जाधव, ॲड. मंथन साळुंखे, ॲड. भुषण बी. सुर्यवंशी, ॲड. सनत पाटील तर महिला सदस्य म्हणुन
,ॲड. प्रतिक्षा शिंदे, ॲड. प्रणाली चौधरी यांची निवड करण्यात आली.
ग्राहक मंचाच्या कार्यकारणी निवडणूक बैठकिला जेष्ठ विधितज्ञ ॲड. वाय. एल. जाधव, ॲड. महेंद्र निळे, ॲड. डी. डी. जोशी, ॲड. एल. पी. ठाकूर, ॲड. संजय शिंपी, ॲड. अमित दुसाने, ॲड. अभिजित पाटील आदी उपस्थित होते. निवडीनंतर सर्व पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.