धुळे जिल्ह्यात सर्व दवाखाने बंद, अत्यावश्यक सेवा सुरू
धुळे : कोलकाता रेप केस प्रकरणामध्ये पीडित डॉक्टर तरुणीच्या शिवविच्छेदन अहवालानंतर तिच्या शरीरामध्ये शंभर ग्रॅम वीर्य आढळल्यामुळे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे नराधमांनी तिच्यावर हा माणूस अत्याचार केल्याचा आरोप करीत इंडियन मेडिकल असोसिएशन असोसिएशनच्या धुळे जिल्हा शाखेने 24 तासांचा संप पुकारला असून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे या संपा दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरूच राहील असेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका : ९ ऑगस्ट रोजी, आर. जी. कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असताना बलात्कार करुन क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.
या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले. आर. जी. कार महाविद्यालय प्रशासन व पोलिस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दिनांक १३ ऑगस्ट रोजी कोलकता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला (CBI) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.
१५ ऑगस्ट रोजी आर. जी. कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेल्या जागेचीही तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो.
या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने १७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ पर्यंत २४ तासांच्या सेवा बंदीचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरू राहतील क्पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासीयांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांस न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती करते आणि डॉक्टरांच्या सुक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करुन कायद्यात बदल करण्याचा आग्रह केंद्र शासनाकडे करते, अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशने घतली आहे.
कोलकाता येथील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातला खुनी संजय रॉयला पोलिसांनी अटक ( Kolkata Rape Case ) केली आहे. तरीही हे प्रकरण गुंतागुंतीचं झालं आहे. त्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण पोलिसांनी सीबीआयकडे सोपवलं आहे. सीबीआयकडे हे प्रकरण आलेलं असताना आता त्यांना या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत.
सीबीआय पुढे कोणते प्रश्न आहेत? : कोलकाता येथील ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार ( Kolkata Rape Case ) नाही तर सामूहिक बलात्कार झाला होता का? संजय रॉय या मुख्य आरोपीशिवाय या घटनेत इतर आरोपीही होते का? संजय रॉय शिवाय इतर आरोपी जर या घटनेत सहभागी होते तर त्यांच्याविषयी काय माहिती मिळाली आहे? सुवर्ण गोस्वामी यांचा दावा काय? या प्रश्नांचं आव्हान आता सीबीआयपुढे असणार आहे. अखिल भारतीय सरकारी डॉक्टर संघाचे अतिरिक्त महासचिव डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी या प्रकरणातील महिलेच्या शवविच्छेदन ( Kolkata Rape Case ) अहवालाचा हवाला देत म्हटलं आहे की हे प्रकरण सामूहिक बलात्कार आणि हत्येचं आहे. सदर महिलेच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्या गुप्तांगात 151 मिली ग्रॅम विर्य आढळल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यावरुन हा दावा गोस्वामी यांनी केला आहे.
डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी आणखी काय म्हटलं आहे? : सुवर्ण गोस्वामींनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक जखमा ( Kolkata Rape Case ) होत्या. त्यांचा हवाला देत गोस्वामी म्हणाले, “ज्या प्रकारे या महिलेच्या अंगावरच्या जखमा होत्या त्या पाहून वाटत नाही की हे एकट्याचं काम असेल. या घटनेत एकापेक्षा अधिक जणांचा सहभाग असू शकतो.” हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर आता आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी हा आऱोप केला आहे की कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातले पुरावे नष्ट करण्यासाठी कट रचला. एवढंच काय तर ज्या ठिकाणी गुन्हा घडला तो तिसरा मजलाही पोलिसांनी सील केला नाही.
पोलिसांनी सेमिनार हॉल सील का केला नाही? : पोलिसांनी ज्या ठिकाणी गुन्हा घडला तो सेमिनार हॉल सील का केला नाही? ९ ऑगस्टला या ठिकाणी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मिळाला होता. तरीही पोलिसांनी हा भाग सील केला नाही. सेमिनार हॉलमध्ये गाद्या, टेबल, बेंच, मशीन आणि लाकडी तसंच प्लास्टिक खुर्च्या दिसत आहेत. मात्र पोलिसांनी हा हॉल सील केलेला नाही असा आरोप आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. एवढंच नाही तर पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. असाही आरोप डॉक्टरांनी केला आहे.