आमदार डॉ. फारुख शाह यांचा कामांचा धडाका सुरूच
धुळे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विविध जाहीर सभा आणि मेळाव्यांमधून विरोधकांनी बोचरी टीका सुरू ठेवली असतानाच, त्याकडे दुर्लक्ष करीत एमआयएमचे आमदार डॉ. फारुख शाह यांनी विकासकामांचा धडाका सुरूच ठेवला आहे. धुळे शहराच्या दुर्लक्षित वस्त्यांमध्ये दररोज रस्ते कामांचा शुभारंभ किंवा झालेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा होत असून, या कार्यक्रमांनी धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक १९ गजानन कॉलनी येथील रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांचे बंधू सलीम हाजी शाह यांच्या हस्ते करण्यात आले.
गजानन कॉलनी व परिसरात पाच वर्षांपूर्वी एक सुद्धा रस्ता नव्हता. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन सुद्धा काम झालेले नव्हते. ही परिस्थिती पाहता या भागातील नागरिकांनी आ. फारुख शाह यांच्याकडे या भागातील मूलभूत सुविधांच्या कामांचे निवेदन दिले. त्याला तात्काळ प्रतिसाद देत आ. फारुख शाह यांनी या परिसरातील रस्त्यांसाठी सुमारे तीन कोटी रुपये या भागातील विकासासाठी शासनाकडून मंजूर करून आणले व या भागातील विविध रस्ते तयार करण्यात आले. त्याचाच एक भाग हा रस्ता असून प्रभाग क्र.१९ गजानन कॉलनी पुर्व हुडको येथील रस्ता काँक्रिटीकरण हे सुमारे २५ लक्ष खर्च करून पूर्ण झालेले आहे. त्याचे लोकार्पण सलीम हाजी यांच्या हस्ते करण्यात आले.
या रस्त्याच्या लोकार्पणाच्या वेळेस सलीम हाजी शाह यांच्यासोबत इकबाल तेली, अनिस सेक्रेटरी, डॉ. शराफत अली, निजाम सैय्यद, वहाब शाह, कैसर अहमद, माजीद पठाण, शकिला अन्सारी, बशीर शाह, फैसल अन्सारी पहिलवान, मुन्नवर शाह, फुझेल आझमी, या परिसरातील शेकडो नागरिक कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते.