बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यात कडकडीत बंद
धुळे : बांग्लादेशात सध्या होत असलेल्या धार्मिक हिंसाचाराच्या विरुध्द शनिवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने धुळे शहरासह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. धुळ्यातील बाजारपेठ, खासगी आस्थापना, खासगी वाहतुक बंद ठेवण्यात आली. तसेच धुळे शहरातून दुपारी भव्य मोर्चा काढून हिंदू एकजुटीचे विराट दर्शन घडविण्यात आले. पोलिस दलाने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची खबरदारी घेतली. सकल हिंदू साजाच्या वतीने पुकारलेल्या या बंदला धुळे शहरात उत्सुर्त प्रतिसाद मिळाला.
धुळे शहरात शनिवारी दुपारी महाराणाप्रताप पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा निघाला. यावेळी हजारोंच्या संख्येने तरुणांसह महिला, पुरुष आणि नागरीक हातात विविध फलक तसेच भगवे झेंडे घेवून मोर्चात सहभागी झाले होते. बांगलादेशातील हिंसाचाराच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत हा मोर्चा आग्रारोडने, कराचीवाला खुंट, पारोळा रोड, महापालिका मार्गे क्युमाईन क्लब येथे पोहोचला. या ठिकाणी मोर्चा विसर्जीत झाला. तसेच मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन दिले.
बांगलादेशातील हल्ल्यांचा तीव्र निषेध : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात राजकीय स्थिती डामाडौल झालेली आहे. तेथील पंतप्रधान शेख हसीना यांनी जिव मुठीत घेवुन भारतात आश्रय घेतला. बांगलादेशात हिंदूंवर तेथील जिहादी मानसिकतेच्या समुहाने अनन्वीत अत्याचार चालविलेला आहे. तेथील हिंदू मंदीरांची तोडफोड करणे, देवांच्या मूर्ती भग्न करणे, हिंदूंची घरे, दुकाने लुटणे, जाळपोळ करणे, हिंदू महिलांवर बलात्कार, अत्याचार करणे, मारहाण करणे, माणूसकीला लाज वाटेल असे कृत्य करून त्यांचे जाहीर प्रदर्शन करणे, अशा परिस्थितीमुळे बांगलादेशात हिंदू समाजाचे जगणे अशक्य झाले आहे. आपला जिव मुठीत घेवून ते सुरक्षीततेच्या दिशेने पळ काढत आहेत. आणि हा सर्व प्रकार तेथील सैन्य व प्रशासन माणूसकी, मानवी हक्क पायाखाली तुडवून उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. याचा हिंदू समाज कडाडून निषेध करत आहे. भारत सरकार या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने बघत आहे, दखल घेत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. परंतू या सर्व प्रकारामुळे भारत देशातील हिंदू समाज प्रचंड दु:खी व क्रोधीत आहे. वारंवार जिहादी मनोवृत्तीचे हिंदू समाजावर होणारे क्रूर अत्याचार हिंदू समाज खपवून घेणार नाही. हिंदू समाजाचा शौर्याचा इतिहास आहे. वेळ आल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. देशातील काही राजकीय व्यक्ती व लोकप्रतिनिधी या विषयासंदर्भात बांगलादेशची भारतात पुनरावृत्ती होवू शकते, असे संकेत देवून उघडउघड देशद्रोहाची बिजे पेरण्याचे काम करत आहेत. अशा जिहादी मानसिकतेचे समर्थन करणार्या व्यक्ती अथवा समुह यांच्यावर देशाच्या आंतरीक सुरक्षीततेच्या दृष्टीने कठोर कारवाई करावी तसेच त्यांचे दहशतवादी संघटना अथवा शत्रू राष्ट्रांशी काही लागेबांधे आहेत का ? हेही देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणे गरजेचे आहे. बांगलादेशवर दबाव टाकावा, बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी तेथील सेनाप्रमुखांशी सरळसरळ चर्चा करावी, हिंदूंवर झालेल्या अत्याचारांची जबाबदारी निश्चीत करून अपराध्यांना कठोर शासन करण्यासाठी बांगलादेशवर दबाव टाकावा, बांगलादेशमधीलच नव्हे तर जगातील कुठल्याही हिंदूंवर अन्याय, अत्याचार झाल्यास आपला भारत देश त्यांच्या मागे भक्कपणे उभा आहे, अशी भूमिका व साद आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवावा, अशी मागणी या निवेदनातून भारत सरकारकडे करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, अनुप अग्रवाल, योगिराज मराठे, सतिष महाले, उमेश चौधरी, प्रदिप कर्पे, गजेंद्र अंपळकर, संजय गुजराथी, देवेंद्र सोनार, संजय बोरसे, अमित खोपडे, संजय अग्रवाल, दिनेश बागुल, गुड्डू अहिरराव, विक्की परदेशी, लोकेश चौधरी, जयश्री अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, हिरामण गवळी, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, प्रभा परदेशी, चेतन मंडोरे, किशोर जाधव, सुनिल चौधरी, मोहन टकले, बबन चौधरी, भिलेश खेडकर, रोहित चांदोडे, आकाश परदेशी, बबलु पाटील, उमेश महाजन आदी सहभागी झाले होते.
शहरात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त : धुळे शहरात पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमिवर शनिवारी सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, सहायक पोलिस अधिक्षक ऋषिकेश रेड्डी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलिस र्कचारी, राज्य राखीव पोलिस दलाची कुमक, गृहरक्षक दलाचे जवान यांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार होवू नये म्हणून पोलिसांची गस्ती पथके देखील शहरात नजर ठेवून होती. अशी माहिती पोलिस दलाच्या वतीने देण्यात आली.