मुंबईसह धुळे जिल्हयात सुरु असलेल्या मेडिकल कॉलेज तसेच BMC, MARD, IMA, JDN आणि ASMI या डॉक्टरांच्या मोठ्या संघटनांनी सुरु केलल्या आंदोलनाला देखील जाहीर पाठींबा
धुळे : कलकत्ता येथे असलेल्या येथील आर. जी .कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. दुसऱ्या बाजूला या घटनेचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतशी नवीन व धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांसह मी एक महिला डॉक्टर म्हणून सदरची घटना व तिचा तपास हा सीबीआयला (केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो) द्यावा अशी मागणी करत आहे. कारण यात रुग्णालयातील काही डॉक्टरांची, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु असल्याने अजून काही लोकांची नावे पुढे येण्याची दाट शक्यता आहे. कारण आतापर्यंत ३० संशयितांची यादी बनवली गेली आहे यामुळे स्थानिक पोलिसांवर दबाव येण्याची देखील दाट शक्यता जनतेमधून व्यक्त होत आहे.
या संदर्भात मुंबईत, धुळे जिल्हयात सुरु असलेल्या मेडिकल कॉलेज तसेच BMC, MARD, IMA, IMA, JDN आणि ASMI या डॉक्टरांच्या जवळपास सर्वच मोठ्या संघटनांनी आंदोलन सुरु केले असून या सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देत धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना यांच्याकडून मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. याबाबत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाचे गृह मंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केली आहे.