आमदार फारुख शाह यांनी रस्ता लोकार्पण करून दिली लाडक्या बहिणींना अनोखी भेट
धुळे : महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी-सुविधांचा विकास योजना अंतर्गत धुळे शहरात प्रभाग १५ सत्यसाईबाबा सोसायटी नामदेव महाजन ते उमेश पाटील ते मनोज ठाकूर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण व गटार करणे या २५ लाख रुपये खर्चाच्या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी आ. फारुख शाह यांना राख्या बांधल्या व झालेल्या कामाबद्दल आभार व्यक्त केले. आ. फारुख शाह यांच्यासोबत डॉ. दीपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, डॉ. शराफत अली, आसिफ शाह, शिवाजी पिंपळे, शहाजी शिंदे, रघुनाथ पाटील, मनोज ठाकूर, निंबा मासुळे, उमेश बागुल, रमेश जोशी, हिरामण पाटील, एम. पी. बागुल, एस. एन. महाजन, भैय्या बच्छाव, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रीती वहाने यांनी केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित महिलांनी आ. फारुख शाह यांना राखी बांधून दुर्लक्षित भागात रस्त्याचे कम करून बहिणींना भेट दिल्याबद्दल आभार मानले.