कनोली मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो; आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते जलपूजन
धुळे : तालुक्यातील नंदाळे शिवारातील कनोली मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. या धरणातील पाण्याचे धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विधीवत जलपूजन करण्यात आले. कनोली नदीवरील कनोली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शिरुड पटट्यातील धरणाच्या लाभ क्षेत्रात येणार्या एकूण 1363 हेक्टर क्षेत्राला सिंचनाला लाभ होणार आहे.
धुळे तालुक्यातील कनोली नदी आणि कनोली धरण क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने कनोली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कनोली धरणातील पाण्याचे आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते बुधवार दि.21 ऑगस्ट रोजी जलपूजन करण्यात आले. यावेळी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, धुळे तालुक्यातील संपूर्ण शेती बागायती व्हावी म्हणून जास्तीत जास्त पाणी अडवून सिंचनाची कामे करण्याचा प्रयत्न राहिला आहे. विकासाची कामे करीत असतांना शेतकरी सुखी झाला पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून लहान मोठे पाझर तलावांचे बांधकाम व त्यांची दुरुस्ती, साठवण बंधार्यांचे बांधकाम करणे त्याचप्रमाणे धुळे तालुक्यातील विविध तलावातील साचलेला गाळ काढून सिंचन चळवळ राबविण्याचे कामाला प्राधान्य देत असतो. यंदाच्या पावसाळ्यात कनोली धरण ओव्हर फ्लो झाल्याने माझ्यासह शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या धरणामुळे शिरुड परिसरातील एकूण 1363 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होईल. शिरुड,नाणे, सिताणे,विंचूर, तरवाडे, नंदाळे व परिसरातील गावातील शेतीला धरणातील पाणीसाठ्याचा उपयोग होणार आहे अशीही माहिती आ.पाटील यांनी यावेळी दिली.
आमदार निधीतून सांडव्यावर फळ्या : कनोली धरणातील पाण्याची साठवण क्षमता वाढावी म्हणून आ.कुणाल पाटील यांच्या आमदार निधीतून सन 2019मध्ये धरणाच्या सांडव्यावर फळ्या बसविण्यात आल्या आहेत. यासाठी एकूण 15 लक्ष रुपये निधी आ.पाटील यांनी दिला होता. सांडव्यावर फळ्या बसविल्याने कनोली धरणाची सुमारे 110 एमसीएफटी साठवण क्षमता वाढली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीची सिंचन क्षमता वाढीस फायदा झाला आहे.
जलपूजनाच्या कार्यक्रमाला आ. कुणाल पाटील यांच्यासोबत ज्येष्ठ नेते रंगराव कोतेकर, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील,संचालक साहेबराव खैरनार, विशाल सैंदाणे, ऋषीकेश ठाकरे, जि. प. सदस्य अरुण पाटील, माजी पं. स. उपसभापती देविदास माळी, जनार्दन देसले, पं. स. सदस्य दिपक कोतकर, दिपक पाटील, कृष्णा पाटील, विजय पाटील, मधुकर पाटील, सरपंच सागर पाटील, अॅड. बी. डी. पाटील, भाऊसाहेब देसले, नंदाळे येथील अनिल पाटील, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, विजय पाटील, शेषराव रामभाऊ पाटील, सुनिल चिंधा पाटील, भानुदास पाटील, दगडू आढावे, गुलाब माळी, पप्पु भदाणे, नंदू भदाणे,शालीग्राम माळी, सरंपच पांडूरंग मोरे आदी उपस्थित होते.