साई पल्लवीच्या बहिणीच्या लग्नाची गोष्ट
Mumbai : साई पल्लवीच्या बहिणीच्या (पूजा कण्णन) लग्नाच्या कार्यक्रमाचे रील सध्या इन्स्टावर येत राहतात. छान कपडे, दागिने, कौतुक सगळं असलं तरी त्यात बराच मिडल क्लास प्रेमळपणा दिसतो. साई पल्लवी तिच्या नटलेल्या बहिणीला, “किती गोड दिसतेयस, एवढे दागिने कधीच घातले नव्हतीस तू. आता एकदम मोठी झाल्यासारखी वाटतेस.” हे इंग्रजीत म्हणताना त्यात नाटकीपणा वाटला नाही. त्यांचा दोघींचा ‘अप्सरा आली’वरचा डान्स तर अफलातून. हजारो सेलिब्रिटी बोलवून, अब्जो पैसे खर्च केलेल्या लग्नापेक्षा हे सगळं भारीच वाटतंय. अगदी बॉलिवूड स्टाईल लग्न, ड्रेसेस आणि पीआर केलेला आहे; हे सगळं दिसत असतानाही त्यात एक एलिगन्स आणि आत्मियता दिसते. हे तमिळ लोक कधी कधी साध्या साध्या गोष्टी मॅजिकल करुन टाकतात.