श्रमदानातून स्वच्छता मोहीम; ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची शपथ
धुळे : स्वच्छता ही सेवा मोहीम 2024 अंतर्गत बुधवारी जिल्हाभरात ‘स्वच्छ भारत दिवस’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी एक तारीख एक – तास उपक्रम अंतर्गत स्वच्छतेसाठी महाश्रमदान करण्यात आले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह अधिकारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सक्रिय सहभाग नोंदविला.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. सौ धरतीताई देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल नरवाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री देवेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत पवार, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा 2024 -स्वच्छता पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात येतआहे. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता अशी यावेळची संकल्पना आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ग्रामीण भागात एक तास स्वच्छतेसाठी हा स्वच्छता श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध स्वयंसेवी संस्था, एनएसएस, बचत गट महिला, स्वच्छाग्रही यासह समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
याप्रसंगी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ ही देण्यात आली. तसेच स्वच्छ माझे अंगण मोहिमेअंतर्गत पात्र कुटुंबांचा सन्मान देखील करण्यात आला. यावेळी कुटुंबांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून सरपंच ग्रामसेवक यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले .
धुळे जिल्हा परिषदेत स्वच्छता शपथ कार्यक्रमधुळे जिल्हा परिषदेत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वच्छता शपथ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ. धरतीताई देवरे, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री हर्षवर्धन दहिते, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती ज्योतीताई बोरसे, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीमती सोनीताई युवराज कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भाऊसाहेब अकलाडेग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश मोरे, , पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप पवार , कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मनीषा वानखेडे यांनी केले.