शहरातील कुठलाच घटक विकासापासून वंचित राहणार नाही : आमदार
धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन २०२४-२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक १७ गुरुकृपानगर, चितोड रोड येथे २५ लक्ष निधीतून सामाजिक सभागृहाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला.
माधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला गणी डॉलर, डॉ. दीपश्री नाईक, डॉ. शराफत अली, निजाम सय्यद, सुरेश अहिरे, भिलाजी आहिरे, हमीद शाह, आसिफ शाह, शहजाद मन्सूरी, कैसर अहमद, फातेमा अन्सारी उपस्थित होते.
गुरुकृपानगर आणि परिसराचा मुख्य प्रश्न म्हणजे राहती घरे नियमानुकुल करण्याच्या बाबतीत रहिवाशांनी समस्या मांडली. त्यानुसार आमदार फारुख शाह यांनी रहिवाशी घरे नियमानुकुल करण्याचे अभिवचन दिले.
याप्रसंगी भीलाजी अहिरे, सुरेश अहिरे, सिद्धार्थ जगदेव यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार फारुख शाह यांनी शहरातील सर्व घटकांना सोबत घेत विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात प्रामुख्याने खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी, फुलेनगर, प्रबुद्ध कॉलनी, नकाणे रोड येथे बुद्धविहार, देवपूर येथे संत रविदास अभ्यासिका, १५० वर्ष जुने असलेल्या कॅथोलिक चर्च, गुरुद्वारा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी राज्य शासनाकडून खेचून आणला. सद्यस्थिती सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र पवार, पवन अहिरे, दत्तू शिंपी, कृष्णा अहिरे, राज अहिरे, सोमनाथ पवार, किशोर अहिरे, शंकर शिरसाठ, दत्तू सूर्यवंशी, किशोर अहिरे, विनोद अहिरे, महेंद्र रखमे, अनिल अहिरे, राजु पाथरे, संजय सुर्यवंशी, यशोदा अहिरे, छोटाबाई रखमे, सविता अहिरे, लक्ष्मी अहिरे, आशाबाई हिरे, कुसुम अहिरे, शांताबाई शिरसाठ, कविता शिंपी, कल्पना शिरसाठ यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल लोंढे यांनी केले तर आभार रवींद्र अहिरे यांनी मानले.