धुळे शहराच्या इतिहासात प्रथमच १०१ कामांचे भूमिपूजन : एकाच दिवशी अन एकाच वेळी
धुळे : शहराचे आमदार फारुख शाह यांनी धुळे शहरात विकासकामांच्या बाबतीत रेकॉर्ड ब्रेक केला. पाच वर्षांच्या काळात सर्व जाती-धर्मीयांची कामे करणाऱ्या आमदारांनी शनिवारी तब्बल एकशे एक कामांचा शुभारंभ करून धुळेकरांना सुखद धक्का दिला. धुळे शहरात क्युमाईन क्लब रस्त्यावर झालेल्या या शानदार भूमिपूजन सोहळ्याला विविध भागातील रहिवासी उपस्थित होते. आमदार फारुख शाह यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात देशातील जातीयवादी धर्मांध पक्षांचा समाचार घेतला. आणि माझ्या विकासकामांमुळे शहरात भाईचारा निर्माण झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांचा विकास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती विकास योजना, पर्यटन विकास योजना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत गेल्या चार महिन्यात शहराच्या विकासासाठी जो निधी आणला आणि त्यातून १०१ पेक्षा जास्त कामे मंजूर करून घेतली. अशा कामांचा शुभारंभ सोहळा आज क्युमाईन क्लब जवळ, जेलरोड येथे झाला. राज चव्हाण, ॲड. पुंजाराम सानप, देविदास जगताप, ॲड. तुषार ससाणे, डॉ. दीपश्री नाईक यांची भाषणे झाली. यावेळी मंचावर सलिम शाह, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र गर्दे, रामेश्वर चत्रे, धम्मचारी अचलाज्योती, नासिर पठाण, मुख्तार अन्सारी, मौलवी शकील, भोलू शाह, राज चव्हाण, निजाम सैयद, डॉ. दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, जगताप साहेब, बंडू गांगुर्डे, निकुंभ जिभाऊ, रफिक शाह, जाधव, जाहीद हाजी, सईद बेग, साजिद साई, आमिर पठाण, सिराजुद्दिन शाह, डॉ. शराफत अली, अफसर शाह आदी मान्यवर उपस्थित होते.