प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या संपादित क्षेत्रात पेरणी करण्यास मनाई
धुळे : प्रस्तावित बोरविहीर (धुळे) ते नरडाणा रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधील क्षेत्र संपादित झालेले आहे. त्या संपादित क्षेत्रात शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या पिकाची पेरणी करु नये. तसेच कोणत्याही प्रकारचे बांधकामे व नविन झाडे लावू नये. असे रोहन कुवर सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रस्तावित बोरविहीर (धुळे) ते नरडाणा रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधील क्षेत्र संपादित झालेले आहे. त्या शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित क्षेत्राचा बहुतांश मोबदला अदा करण्यात आला आहे. भुसंपादन रेल्वे (सुधारणा) अधिनियम 2008 चे कलम 20 (E) अन्वये संपादित क्षेत्र रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरीत झालेले आहे. त्यानुसार रेल्वे मार्गाचे काम सुरू झालेले आहे. त्या अनुषंगाने संपादित क्षेत्रात काम करण्यास व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणेत येईल याची सर्व संपादीत क्षेत्रातील जमीन धारकांनी नोंद घ्यावी. असेही उपविभागीय अधिकारी कुवर यांनी कळविले आहे.