राज्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 राबविण्यास मंत्रीमंडळाची मंजूरी
मुंबई : राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा (शहरी) दुसरा टप्पा राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. शहरी भागात लाभापासून वंचित असलेल्या बेघर कुटुंबांना हक्काचे घर होणार आहे.
संक्षिप्त निर्णय मंत्रिमंडळ बैठक : दि. 14 ऑक्टोबर 2024
- मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)
- आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
- समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)
- दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
- आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
- वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
- राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
- पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
- खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
- राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
- पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
- किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)
- अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
- मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)
- खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
- मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
- अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
- उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
- कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)