राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ॲड. रोहित पाटोळे यांची नियुक्ती
शिरपूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी शिरपूरचे ॲड. रोहित पाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. पाटोळे यांच्या नियुक्तीनंतर शिरपूर तालुक्यातील शेकडो पुरोगामी विचारांच्या तरूणांचा पक्षात ओघ वाढला आहे.
शिरपूर येथे शुक्रवारी झालेल्या जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्यात ॲड. रोहित पाटोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तालुक्यातील शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते ॲड. राहुल मखरे, डॉ. जितेंद्र ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पवार, शहर अध्यक्ष हेमराज राजपूत यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा तळागाळात आणि गावागावात पोहोचण्यासाठी काम करू. तसेच विधानसभा निवडणुकीत शिरपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा आमदार निवडून आणण्यासाठी संपूर्ण तालुका पिंजून काढण्याचा निर्धार ॲड. पाटोळे यांच्यासह प्रवेश केलेल्या युवकांनी केला.
प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची नावे अशी : दिलीप भाईदास पाटील, देवदत्त सोनवणे, सुनील शिरसाठ, राजेंद्र पाटील, राकेश माळी, भटू माळी, रावसाहेब पाटील, किशोर पाटील, दिलीप मिस्तरी, भटू कोळी, स्वप्निल भामरे, धम्मदीप बाविस्कर, दीपक ठाकरे, संजय भिल, प्रदीप ठाकरे, गोरख पाटील, बापू ठाकरे, किशोर गुलाब पाटील, संतोष थोरात, प्रा. निरंजन वेंदे.