हजारोच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शनासह आ. काशिरामदादा पावरा यांचे नामांकनपत्र दाखल
शिरपूर : शिरपूर तालुक्याला आपण मनापासून घडविले आहे. सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाने मी व आ. काशिराम पावरा आजपर्यंत मनापासून काम करतोय. जनतेने आम्हाला फार प्रेम दिले असून संपूर्ण तालुका माझ्याआमच्या सोबत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. तालुक्यात शिरपूर पॅटर्न अंतर्गत 386 बंधारे बांधले असून भूजल पातळी वाढत आहे. शिरपुरात हजारो मुलेमुली दर्जेदार शिक्षण घेत आहेत. तालुक्यातील हजारो विद्यार्थी देशात, परदेशात उच्च पदस्थ नोकरी करत आहेत. संपूर्ण तालुका सुखी संपन्न करतोय,
आम्ही सर्वांच्या भल्यासाठी काम करतोय. आपल्याला राज्य, केंद्र शासनाने खूप योजना दिल्या असून आमदार कार्यालय मार्फत आपण मनापासून राबवित आहोत. लाडकी बहीण योजनेतून तालुक्यात 1 लाख 10 हजार महिला भगिनींना लाभ मिळवून देण्यासाठी आपण मनापासून काम केले. मेडिकल, शिक्षण, आरोग्य, रोजगार, औद्योगिक क्षेत्रात आपण काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार लाभार्थीच्या डायरेक्ट खात्यात पैसे जमा करते, ही आनंददायी बाब आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्त अनेक योजना भूपेशभाईंनी जाहीर केल्या. त्या लवकरच सुरु करत आहोत. करवंद, नागेश्वर, असली येथे आम्ही लाखोच्या संख्येने वृक्षारोपण करत आहोत. कोरोना काळात हजारो रेमडेसीवर अल्पदरात दिले. संपूर्ण तालुका माझा समाज आहे, मी सरदार पटेल यांचा पणतू आहे. मी व दादा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासाठी काम करणार. आ. काशिराम पावरा हे प्रामाणिक आमदार आहेत. त्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्या. कोणाच्याही भूल थापाना बळी पडू नका. यापुढेही आमच्यावर विश्वास दाखवा, तुमचा विश्वास सार्थ ठरवू असे प्रतिपादन आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह भाजपा व महायुतीचे अनेक पदाधिकारी तसेच शिरपूर तालुक्यातील हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत 28 ऑक्टोबर 2024 रोजी आमदार काशिराम दादा पावरा यांची उमेदवारी दाखल करण्यात आली. फार्मसी कॉलेज ते तहसील कार्यालय परिसरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणा दिल्या.
सुरुवातीला आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या ग्राउंडवर 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पदाधिकारी व कार्यकर्ते यांची जाहीर सभा घेण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर आमदार अमरिशभाई पटेल, उमेदवार आमदार काशिराम दादा पावरा, बडवाणी खासदार गजेंद्रभाई पटेल, नवसारी आमदार राकेश देसाई, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रवासी नेता दिपक देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुका महायुती समन्वयक डॉ. तुषार रंधे, जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अशोक धुराई, नरेंद्रसिंह जमादार, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, विधानसभा निवडणूक प्रमुख के.डी.पाटील, मनुदादा पाटील, तालुका प्रभारी हेमंत पाटील, माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शिवसेना तालुकाध्यक्ष कन्हैया चौधरी, शहराध्यक्ष मनोज धनगर, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, पं. स. सभापती लताबाई पावरा, उपसभापती विजय बागुल, कारखाना चेअरमन माधवराव पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा, शेखर पाटील, ओबीसी प्रदेश सचिव श्यामकांत ईशी, वसंत पावरा, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, शहराध्यक्ष हिरा वाकडे, दिनेश मोरे, ऍड. आशिष अहिरे, निलेश गरुड, आरपीआय अध्यक्ष बाबा थोरात, महायुती पदाधिकारी, नितीन गिरासे, रजाक कुरेशी, इरफान मिर्झा, राजू शेख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, महिला मोर्चा अध्यक्ष संगिता देवरे, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बोरसे, विविध मोर्चा पदाधिकारी, तालुक्यातील नागरिक, महिला पुरुष युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बडवाणी खा. गजेंद्रसिंह पटेल म्हणाले, श्रद्धेय भाईंनी व दादांनी शिरपूर तालुक्याला मनापासून घडवले आहे. त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे असून मोठ्या मताधिक्याने शिरपूरची जागा निवडून येईल असा विश्वास आहे.
आ. काशिराम दादा पावरा म्हणाले, मला आशीर्वाद देण्यासाठी हजारोचा समुदाय उपस्थित असल्याचे पाहून आनंद होतोय. मला पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याने मी आभार मानतो. भाईंच्या मार्गदर्शनाखाली मी मनापासून काम केले, यापुढे 5 वर्षात मी मोठ्या जोमाने काम करेल. भाईंनी व मी आत्मा ओतून काम केले आहे. कोणत्याही अमिषाला आजपर्यंत बळी पडलो नाही, आपला तालुका अजून मजबूत करायचा आहे, विश्वास ठेवून मला विजयी करा.
नवसारी आमदार राकेश देसाई म्हणाले, मान उंच करणारे कार्य भाई व दादा यांनी केले आहे. महायुती सरकार मोठ्या मताधिक्याने बनेल.
भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून आमदार काशशिराम दादा पावरा यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी तर आभार भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष जयवंत पडवी यांनी मानले.