दोन्ही आमदारांच्या परिश्रमामुळे शिरपूर तालुक्याचा कायापालट झाल्याचे चित्र अतिशय समाधानकारक : स्मृति इराणी यांचे प्रतिपादन,
शिरपूर : देशाच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी देशाला नवी दिशा दिली असून जगातील विकसित देश म्हणून सन्मान प्राप्त करुन दिला आहे. पंतप्रधान मोदीजी यांनी संसदेत प्रवेश करतांना डोके टेकले, ही आपली महान संस्कृती आहे. सर्वांना सन्मान देण्याचे कार्य मोदीजी यांनी केले आहे. भाई आपले काम मोठे असून आपल्या संस्थेतून असंख्य विद्यार्थी घडविल्याची बाब आनंददायी आहे. आपल्याकडे लवकरच एम.आय.डी.सी. होऊन विकासात भर पडावी अशा शुभेच्छा देते. निवडणूक हा उत्सव असतो, आपण आनंदाने भाजपाला मतदान करावे. शिरपुरात 1 हजार बेडचे हॉस्पिटल होत असून यामुळे हजारो गरजू रुग्णांची सोय होईल. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा तालुक्यात हजारो लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिल्याचा आनंद आहे. तसेच आ.अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे देशाच्या सुवर्ण इतिहासात शिरपूरचे पान देखील जोडले जाईल. दोन्ही आमदारांच्या परिश्रमामुळे शिरपूर तालुक्याचा कायापालट झाल्याचे अतिशय समाधानकारक चित्र दिसून येते. लाडकी बहीण योजना व सर्वसामान्य जनतेच्या असंख्य योजना यापुढेही अखंडपणे सुरु राहतील. भाजपाला न चुकता मतदान करा. प्रत्येक क्षेत्राला सरकार कडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे, नवतरुण वर्गाला दिशा देणारे भाजपा सरकार मनापासून काम करत आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी केले.
माजी केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांची शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी व महायुती चे उमेदवार काशिराम वेचान पावरा यांच्या प्रचारार्थ 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी जनक व्हिला, रामसिंग नगर, शिरपूर येथे जाहीर सभा संपन्न झाली.
यावेळी भारत माता की जय… जय जय श्रीराम… चा जयघोष मोठ्या प्रमाणात करण्यात आला.
यावेळी आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले, शिरपूर तालुक्याचा विकास हेच आमचे व्हिजन आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विकास व्हावा यासाठी आपण गेल्या 35 वर्षांपासून मनापासून काम करत आहोत. हजारो युवकांना रोजगार दिला असून अजुनही रोजगार देण्याची देण्याची व्यवस्था करतोय. आरोग्य, पाणी, उच्च शिक्षण, रोजगार, औद्योगिक क्षेत्रात सर्व जनतेसाठी, नवीन पिढी साठी मोठी काम केले आहे. शिरपूर पॅटर्न अंतर्गत 386 बंधारे झाले, येत्या काळात अजून 350 बंधारे तयार करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर तालुक्यात एम.आय.डी.सी. ची मागणी पूर्ण केली असून हजारो युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. 1 हजार बेडचे हॉस्पिटल लवकरच सुरु करुन कमी खर्चात अतिशय उत्तम आरोग्य सेवा देणार आहोत. आमदार कार्यालयात जनतेसाठी शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. आ. काशिराम दादा पावरा हे प्रामाणिक व निष्कलंक असून अशा नेत्याचे जतन करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन भाईंनी केले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री स्मृति इराणी, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, भाजपा प्रवासी नेता दिपक देसाई नवसारी, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, सौ. कृतिबेन पटेल, सौ. रीटाबेन पटेल, विधानसभा भाजपा महायुती समन्वयक डॉ. तुषार रंधे, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, निवडणूक प्रभारी के. डी. पाटील, सौ. संगिता देवरे, दत्तू पाडवी, सुभाषसिंह जमादार, बाळू पाटील, युवराज राजपूत, कन्हैया चौधरी, मनोज धनगर, सुभाष कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, महिला पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वि. का. सोसायटी पदाधिकारी, विविध संस्था पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पुरुष, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार काशिराम पावरा म्हणाले, शिरपूर तालुका सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर राहण्यासाठी आतापर्यंत शासनाच्या अनेक योजना आम्ही यशस्वीपणे राबविल्या. भाई व मी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी आणून तालुक्याचा विकास साधतोय. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी आमदार कार्यालयामार्फत 120 स्वयंसेवक युवकांमार्फत यंत्रणा राबविली जात आहे. गेल्या 15 वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केले असून यापुढे दुप्पट कामे करणार असेही ते म्हणाले.
माजी जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जि. प. सदस्य संजय पाटील, महिला पदाधिकारी, अनेक मान्यवर यांनी आपल्याला मनोगतात शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी काशिराम दादा पावरा यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी केले.