पोदार इंटरनॅशनल स्कूल धुळे येथे जगातील अव्वल फ्रीस्टाईल फुटबॉलपटू जेमी नाईट यांची कार्यशाळा
धुळे : पोदार इंटरनॅशनल स्कूल, धुळे तर्फे जगातील टॉप टेन फ़ुटबॉल फ्रीस्टाईलर पैकी एक जेमी नाईट यांना शुक्रवारी (तारीख 21 फेब्रुवारी 2025) शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. जेमी नाईट यांच्या नावे अनेक गिनीज बुक विक्रम आहेत, त्यांनी धुळे येथे प्रथमच भेट दिली. जेमी जगातील सर्वात अनुभवी आणि सर्वाधिक मागणी असलेल्या व्यावसायिक फुटबॉल फ्रीस्टाइलर्सपैकी एक आहे. पोदार एज्युकेशन नेटवर्कच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून त्यांच्या भारत भेटीमध्ये खेळावर जास्त लक्ष केंद्रित करणे आणि विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून उत्कृष्ट कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे मिळविण्यात सक्षम बनवणे होते.

जेमी नाइट आपल्या अविश्वसनीय नियंत्रण, अचूकता आणि सर्जनशीलतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. फुटबॉलमधील त्यांच्या कौशल्याने त्यांनी जागतिक ब्रँड्ससोबत सहयोग केले, आणि २०१७ व २०१८ च्या UEFA चॅम्पियन्स लीग फायनल्समध्ये मैदानावर अप्रतिम सादरीकरण केले. त्याच्या सातत्य आणि सूक्ष्म अंमलबजावणीमुळे त्याला जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंकडून तसेच चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. वर्ध्यामध्ये त्यांनी सादर केलेल्या खेळ आणि अद्भुत कामगिरीने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना थक्क केले. जेमीचा ठाम विश्वास आहे की फ्रीस्टाइल फुटबॉल शारीरिक आणि मानसिक आरोग्य विकसित करण्यात मदत करते आणि वाढीच्या मानसिकतेचे महत्त्व शिकवते. यामुळे पोदार एज्युकेशन नेटवर्कचा सर्वांगीण शिक्षणाला भक्कम पाठिंबा मिळतो.

यावेळी बोलताना जेमी नाईट म्हणाले, “भारतातील हा माझा पाचवा दौरा आहे, आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉलबद्दलची ऊर्जा, कौशल्य आणि आवड पाहून खूप आनंद झाला. फुटबॉलमध्ये भारताची क्षमता अफाट आहे, आणि अशा समर्पणासह भारत लवकरच जागतिक स्तरावर, कदाचित फिफा वर्ल्ड कपमध्येही, स्पर्धा करू शकेल, असा मला प्रामाणिक विश्वास आहे. भारतात पुन्हा यायला मला खूप आवडले.”

पोदार एज्युकेशन नेटवर्कचे संचालक हर्ष पोदार म्हणाले, “आमच्या शाळेत जेमी नाइट यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी खरोखर प्रेरणादायी अनुभव ठरली. त्यांच्या कलेप्रती असलेली त्यांची समर्पण भावना आणि आवड हे कठोर परिश्रम व दृढ निश्चयाने काय साध्य करता येऊ शकते, याचे शक्तिशाली उदाहरण आहे. पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या प्रतिभावंतांशी संवाद साधण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, ज्यामुळे त्यांना अशा रोल मॉडेल्सकडून मौल्यवान धडे घेता येतील. अशा अनुभवांमुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्टतेची आजीवन आवड निर्माण होईल आणि ती त्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास मदत करेल, मग ती खेळात असो किंवा इतर क्षेत्रांमध्ये.”

पोदार एज्युकेशन नेटवर्क बद्दल थोडेसे : पोदार एज्युकेशन नेटवर्कची स्थापना शेठ आनंदीलाल पोदार यांनी १९२७ मध्ये केली होती, अगदी सुरुवातीपासूनच, प्रामाणिकपणा, सचोटी आणि सेवा या पारंपारिक भारतीय मूल्यांवर लक्ष केंद्रित केले आणि प्रेरित केले गेले. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आनंदीलाल पोदार ट्रस्टचे पहिले अध्यक्ष म्हणून या बांधिलकीची साक्ष देतात. शिक्षणक्षेत्रातील ९७ वर्षांहून अधिक अनुभवांसह, पोदार एज्युकेशन नेटवर्क आता १४९ पोदार इंटरनॅशनल स्कूल्सचे नेटवर्क आहे. ८,००० पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग काम करत असून २,५०,००० पेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.
