A society that does not take dowry! The deputy mayor praised the Buddhist bride and gathered enthusiasm हुंडा न घेणारा समाज! उप महापौरांनी केले कौतुक, बौध्द वधू वर मेळावा उत्साहात
# Dhule धुळे: आपला बौध्द समाज हुंडा न घेणारा समाज असून, आपल्याला त्याचा अभिमान आहे. ही क्रांतीकारी परंपरा अशीच चालू ठेवावी. तसेच समाजात एक दोन टक्के असलेले घटस्फोटाचे प्रमाण कमी झाले पाहिजे, अशी अपेक्षा धुळे महापालिकेचे उप महापौर नागसेन बोरसे यांनी व्यक्त केली. बौध्द समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी त्यांनी ५० हजार रुपये देणगी जाहीर केली. लुंम्बिनीवन बहुउद्देशीय संस्था धुळे तर्फे शनिवारी सैनिक कल्याण भवनात आयोजित बौध्द वधू वर परिचय महामेळावाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विधीज्ज्ञ विलास झाल्टे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सुशिला ईशी, अभियंता अविनाश थोरात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विजय दामोदर, एस. यु. तायडे, अशोक वाघोदे, बी. यु. वाघ, सुरेश लोंढे, नितीन गायकवाड, सरोजताई कदम, शोभाताई आखाडे, संगिताताई खैरनार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. ईश्वरचंद्र खैरनार, राजेंद्र थोरात, मेजर गोरख मंगळे, बी. बी. सावळे, आर. यु. पवार, डॉ. सुरेश बिर्हाडे, नानासाहेब देवरे, सिध्दार्थ जाधव, विशाल वाघोदे आदींनी परिश्रम घेतले.