न्याहळोद ते कौठळ रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी
धुळे: धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील न्याहळोद ते कौठळ दरम्यान रस्ता सुधारणे कामासाठी आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने सुमारे 5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्याचा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात समावेश केला गेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धुळे तालुक्यातील रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी आमदार कुणाल पाटील हे रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत असतात. रस्त्यांच्या विकासातून दळणवळण वाढते आणि दळणवळणामुळे विकासाला चालना मिळत असते. न्याहळोद ते कौठळ रस्त्याची सुधारणा करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वाहनधारक व प्रवाशांची होती. त्यामुळे सदर रस्त्याची सुधारणे कामी आमदार कुणाल पाटील यांनी या रस्त्याचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार या रस्त्याला नुकत्याच सादर अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. रस्त्याच्या कामासाठी एकूण पाच कोटी रुपये निधीचीही तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे. सदर रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी, वाहनधारक,नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.