Administration pressure on striking employees, warning of disciplinary action
संपकरी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचं दबावतंत्र, शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा
#Dhule धुळे: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. दरम्यान, प्रशासनाने दबावतंत्राचा अवलंब केला असून, शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसे परिपत्रक जिल्हाधिकार्यांनी सोमवारी सायंकाळी काढले. मुंबई येथे झालेल्या बैठकीत, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परंतु, राज्य सरकारी कर्मचारी संपाच्या निर्णयावर ठाम आहेत. धुळे शहरात कल्याण भवनात सोमवारी सायंकाळी बैठक झाली. मंगळवारी सकाळी भव्य मोर्चा काढून संपाला सुरूवात होणार आहे. राज्यभरातील १७ लाख कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.
I would like to thank you for the efforts youve put in writing this website. I am hoping to view the same high-grade content by you later on as well. In fact, your creative writing abilities has inspired me to get my own blog now 😉
Very nice article. I definitely appreciate this website. Thanks!