One mission, old pension! Shouting slogans, the government decided to hold a Holi एकच मिशन, जुनी पेन्शन! घोषणाबाजी करीत शासन निर्णायाची होळी केली
#JuniPenssionYojana धुळे: जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास समितीच्या शासन निर्णयाची कर्मचाऱ्यांनी बुधवारी होळी करीत निषेध नोंदविला. शहरातील कामगार कल्याण भवन शेजारी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राज्य सरकारने जुनी पेन्शन व त्या अनुषंगाने पर्यायी योजना कर्मचाऱ्यांना लागु करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना केली आहे. तसा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. हा निर्णय एकतर्फी जाहीर केला आहे. मुळातच यापूर्वी अशाप्रकारच्या अभ्यास गटाची समिती गेल्या तीन वर्षांपासून काम करीत होती. त्या समितीने तीन वर्षात शासनाला अहवाल सादर केला नाही. नवीन समिती तीन महिन्यात अहवाल कसा देऊ शकेल? हे निव्वळ वेळकाढूपणाचा आणि संपात फुट पाडण्यासाठीचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे. मुळातच समन्वय समितीने जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याचे धोरण सरकारने जाहीर करावे अशी मागणी केली आहे. हे मान्य करता नवीन समिती निर्णयाचा समन्वय समितीकडुन निषेध व्यक्त करीत शासन निर्णायाची होळी करण्यात आली.
यावेळी समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. संजय पाटील, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अशोक चौधरी, सुधीर पोतदार, दीपक पाटील, राजेंद्र माळी, मोहन कापसे, प्राथमिक शिक्षक समितीचे राजेंद्र पाटील, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे प्रा. बी. ए. पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे संजय पवार, कर्मचारी संघटनेचे सुरेश बहाळकर, योगेश जिरे, सुरेश पाईकराव, दीपक रासने, पंकज अहिरराव, सुशिल घाडगे, प्रतिभा घोडके, पूनम पाटील, व्हिक्टोरिया पाथरे, सुजाता जयकर , नागेश कंडारे, भूषण पाटील, जिभाऊ बच्छाव, सुधीर खैरणार, अतुल ठाकुर, उदय पाठक, प्रविण राजपूत आदी उपस्थित होते.
You should take part in a contest for one of the greatest sites on the web. Im going to recommend this web site!