The real need for pension is… पेन्शनची खरी गरज यांना आहे…
#Dhule धुळे : EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती धुळे जिल्हा संघटनेच्या वतीने किमान ७५०० पेन्शन व महागाई भत्ता मिळावा या मागण्यांसाठी आज मुंबई आग्रा हा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने आज संपूर्ण राज्यभरात आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, किमान 7500 पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता मिळावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारी चौफुली जवळ हा रास्ता रोको करण्यात आला होता या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती राज्यात ईपीएस 95 पेशंट धारकांची संख्या ही 70 लाख असून या कामगारांनी दरमहा 417, 541 आणि 1250 अंशदान पेन्शन फंडात दिले आहेत तसेच आपले ऐन तारुण्यातील 30 ते 35 वर्ष देश निर्मितीसाठी खर्ची घातली असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर त्यांना 7500 पेन्शन मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
देवीसिंग जाधव यांनी अधिक माहिती दिली.