Smriti Irani shared a very bitter experience
स्मृती इराणी यांनी शेअर केले अतीशय कटू अनुभव
Mumbai मुंबई: अभिनेत्री ते नेता असा यशस्वी प्रवास करणाऱ्या स्मृती इराणी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अतीशय कटू अनुभव शेअर केले आहेत. गर्भपातानंतर देखील आपल्याला शुटवर बोलावले होते, असे त्या म्हणाल्या.
प्रेग्नंट असताना काम करत होत्या. एकेदिवशी काम करताना त्यांना सेटवरच अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे त्यांनी निर्मात्यांना घरी जाण्याची परवानगी द्यायला सांगितलं. त्यानंतर त्यांचं मिसकॅरेज झालं. स्मृती यांनी सांगितलं की, ‘डॉक्टरांनी मला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. तिथं जात असताना रस्त्यातच रक्त वाहू लागलं. त्यावेळी पाऊस पडत होता. मी एक रिक्षा थांबवली आणि त्याला रिक्षा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. मी रुग्णालयात गेले तिथं एक नर्स माझ्याकडे धावत आली आणि त्याही परिस्थितीमध्ये तिनं माझ्याकडे सही मागितली. मी तशा अवस्थेतही तिला निराश केलं नाही. मी तिला सही दिली. त्यानंतर तिला सांगितलं की मी इथं अॅडमिट होण्यासाठी आले आहे. कारण मला असं वाटतं की माझं मिसकॅरेज झालं आहे.’
अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केलेल्या स्मृती यांनी मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं की,’गर्भपातानंतर दुसऱ्या दिवशी घरी आले. त्यावेळी प्रोडक्शनकडून शूटिंगबाबत विचारण्यासाठी फोन आला होता. त्यावेळी मी त्यांना माझ्या परिस्थितीबद्दल सांगितलं. तरी त्यांनी मला सांगितलं की सकाळी नका येऊ, दुपारी २ च्या शिफ्टला तुम्ही या.’ ‘क्योंकी..’च्या प्रोडक्शन टीमकडून त्यांना असा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी स्मृती ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेत काम करत होत्या, तर त्या रवी चोप्रा यांच्या ‘रामायण’ मालिकेत सीता मातेची भूमिका साकारत होत्या.
स्मृती यांनी पत्रकार, आरजे, गीतकार नीलेश मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केला. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की, मालिकेत काम करत असताना त्यांचा गर्भपात झाला होता. मात्र या घटनेनंतर काही तासांतच त्यांना पुन्हा शूटिंगसाठी बोलावण्यात आले, स्मृती यांनी या मुलाखतीमध्ये हा धक्कादायक प्रसंग सांगितला.
एक काळ टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणून गाजवणाऱ्या स्मृती इराणी यांनी आज ‘केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी’ म्हणून आपलं स्थान निर्माण केलं आहे. टेलिव्हिजनमधून सुरुवात करणाऱ्या स्मृती यांना संपूर्ण देश ‘तुलसी विरानी’ या नावानं ओळखतो. एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत स्मृती यांनी तुलसी ही भूमिका साकारली होती. सात वर्षे स्मृती यांनी या मालिकेत काम केलं. त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी कार्यक्रमाला अलविदा केलं.